Crime sakal
मराठवाडा

Crime News : दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगार व नातेवाईकांनी केली दगडफेक

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२३ मध्ये पानगाव एका वस्तीवरील नागरिकांनी दरोडा टाकला होता.

दिलीप गंभिरे

कळंब - येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावर दरोडा प्रकरणातील गुन्हेगार व नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक करत प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना येरमाळा तेरखेडा महामार्गावर पानगाव येथील एका हॉटेल जवळील वस्ती येथे बुधवार (ता. १३) दुपारी साडेबारा वाजनेच्या सुमार घडली आहे. आता पोलिसावर हल्ले केल्याप्रकरणी येरमाळा पोलिसात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२३ मध्ये पानगाव एका वस्तीवरील नागरिकांनी दरोडा टाकला होता. याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध येरमाळा पोलिसात गुन्हे दाखल झाले होते. दरोड्याच्या प्रकरणातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक कळंब येरमाळा मार्गावर एका हॉटेल जवळ असलेल्या वस्तीवर दाखल झाले.

संशयित आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता, आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार व इतर १० ते १५ या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून मोठ मोठ्याने आरडा ओरड करुन रस्त्यावरील वाहतूक आडवून पोलीस पथकावर दगड फेक केली.

एखाद्याचा जीव जावू शकतो हे माहित असताना देखील दगड फेक करुन पोलीस पथकातील अधिकारी व अमंलदार यांना जखमी करुन शिवीगाळ व धक्काबुक्की करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बबन जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा जीव धोक्यात -

गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचा जीव धोक्यात सापडत आहे. मागील वर्षभरात येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसावर दगफेकीच्या अनेक घटना घडल्याने पोलिसच असुरिक्षत झाले आहेत. असे असले तरी पोलिसांनी कर्तव्यात माघार न घेत आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. विशेष म्हणजे येरमाळा तेरखेडा राष्ट्रीय महामार्गावर चर्चेतील गुटखा प्रकरणात ही पोलिसावर हल्ला करण्याचा प्रकार घडला होता.

राष्ट्रीय महामार्ग अडवून पोलिसावर हल्ले -

सोलापूर धुळे या येरमाळा ते तेरखेडा राष्ट्रीय महामार्गावर दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीने आपल्याला ताब्यात घेवू नये यासाठी आरडा ओरडा करत ड्रामा केला.नंतर पोलिसांचे आरोपी पकडण्याचे धाडस पाहून संशयित व त्यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक अडवून पोलिसावर दगडफेक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

Asia Cup 2025: केएल राहुलची भारताच्या टी२० संघात का निवड होऊ शकत नाही? कारण आले समोर

Latest Marathi News Updates : भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT