latur latur
मराठवाडा

Crop Insurance: शेतकऱ्यांच्या मदतीला ‘शेतकऱ्यांची पोरं’

मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची ऑनलाइन तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर न केल्याचा बहाणा देत विमा कंपनीने तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे

केतन धवन

उजनी (लातूर): पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच विमा कंपनीच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये असंख्य त्रुटी असल्याचे पहावसाय मिळत आहे. यात शेतकरी वेळेत नुकसानीची माहिती कंपनीला कळविण्यास अपयशी ठरत आहे. त्या अनुषंगाने ‘शेतकऱ्याची पोरं’ या संघटनेने शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची ऑनलाइन तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर न केल्याचा बहाणा देत विमा कंपनीने तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे. यावर्षीही मोठ्या पावसामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. परंतु, तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना कंपनीला पीक नुकसानीची माहिती कळविण्यास अडचणी येत असल्याची बाब ‘शेतकऱ्याची पोरं’ या समुहाने निदर्शनास आणली.

या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार ऑनलाइन दाखल करता यावी, यासाठी येथील शेतकऱ्यांची पोरं संघटनेच्या वतीने प्रत्येक गावात तांत्रिक सहाय्यक नेमण्यात आला आहे. यात तालुक्यातील तब्बल ८० गावांमध्ये अजिंक्य शिंदेच्या मार्गदर्शनाखाली टीम गठित करण्यात आली आहे. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘शेतकऱ्याची पोरं’ च्या सदस्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT