जाफराबाद : मध्यवर्ती बँकेत लोकांनी केलेली गर्दी. 
मराठवाडा

कोरोनाचा विळखा, तरिही गर्दी, घोळका 

गजानन उदावंत

जाफराबाद (जि.जालना) - शहरासह तालुक्यात एकीकडे कोरोनाचा विळखा असतानाही दुसरीकडे गर्दी आणि घोळकाही कायम असल्याचे विदारक चित्र आहेत. डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहेत. 

जालना जिल्ह्यातील तालुक्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आदर्श गांव खासगाव आणि वरुडच्या लोकांनी स्वयंस्फुतीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.एकीकडे जाफराबाद शहर आणि तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असतांना दुसरीकडे शहरातील गर्दी जाफराबादवासियांची चिंता वाढवणारी आहे. जाफराबाद तालुक्यात कोरोनाचे अठरा जण मिळुन आले.

आरोग्य विभागाच्या माध्यमातुन प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत रॅपिड अँटीजेन किटव्दारे नमुने घेण्यात आले. ज्यात ६८ पैकी १८ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.ज्यात वरुड बुद्रूकचे तीन ,खासगांवातील नऊ ,जाफराबाद एक ,माहोरा पाच असे एकुण १८ जण पॉझिटिव्ह मिळुन आले . वास्तविक कोरोनाला प्रतिबंध करण्याहेतु प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेने केलेल्या सहकार्यामुळे चार महीन्याच्या कोरोनाच्या महामारीत तुर्तास तरी जाफराबाद शहर कोरोना मुक्त होते. जाफराबाद शहरासह टेंभुर्णी, हिवराकाबली,भारज बुद्रुक, पिंपळखुटा, बुटखेडा या गावात कोरोनाचा फैलाव झाला होता. नियंत्रणात आणण्यासाठी ते गांव आणि कॉलनी सिल करण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्याविरुध्द कारवाई केल्या होत्या. पुढे लॉकडाऊन मध्ये शिथीलता दिल्यानंतर जाफराबाद शहरात आणि तालुक्यात सर्व व्यवहार सुरु करण्यात आले. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे,ते न करता सर्व नियमांची सर्रास पायमल्ली होतांना दिसुन येत आहे. मुख्यत्वे व्यक्ती व्यक्तीतील आवश्यक असणारे सामाजिक अंतर, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तोंडाला मास्क,व रुमाल न लावता मुक्तपणे वावर सुरु आहे. तसेच सॅनिटायजरचा वापर देखिल करतांना दिसुन येत नाही.जाफराबाद शहरातील विविध बँका, चौक, बाजार याठिकाणी डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे. कोरोना महामारी पासुन बचावासाठी प्रत्येकाने आपआपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT