file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात एक ते सात मार्चपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोव्हीड- १९ बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सात दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. सोमवार ता. एक ते सात मार्च दरम्यान हे आदेश लागु राहणार आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी  हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस ( व्यक्ती, वाहन ) व सर्व जास्थापना, दुकाने, खानावळ आदीसाठी हे आदेश राहणार आहेत. सदर कालावधील दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी नऊ ते सायकाळी पाच पर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील सदर कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहतील. याकरिता संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये - जा करण्यासाठी मुभा राहील. परतु सोबत ओळखपत्र ठेवणे बधनकारक राहील, या कालावधीत जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे , सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स बंद राहतील.  औषधी दुकाने चालू ठेवण्यास मुभा राहील. पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांना सदर कालावधीत  कार्यालयीन कामकाजासाठी ये - जा करण्यास मुभा राहील . परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची कामे  दुरुस्ती करण्यास, आरोग्य शासकीय विभागाशी सबंधीत बांधकामे, महावितरण, महापारेषण आणि इतर विदयुत विषयक विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे. दूरसंचारशी संलग्न सेवा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि स्वछता विषयक कामे, या कार्यालयामार्फत परवानगी देण्यात आलेल्या वाळू घाटातून रेली उत्खनन व वाहतूक संबंधित कामे करण्याम मुभा राहील. याकरिता संबंधीत विभागाकडील आदेश ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील,  पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा सबंधीत वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहतील, 

बाहेरील विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातील अडकलेले नागरिक यांच्या परवानाधारक खानावळ हॉटेल, पार्सल सुविधेसाठी सकाळी नऊ ते  रात्री सात उघडण्यास मुभा असेल.  संघाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर बंधनकारक राहील. यानुसार संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये गल्लीमध्ये, गावामध्ये घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याचे विरोधात भारतीय दंड संहिता  कलम  अन्वये शिक्षेस पात्र राहील असे आदेश रविवारपासून (ता. २८) निर्गमित करण्यात येणार आहेत

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Elections: घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

एर्नाकुलम एक्सप्रेसच्या २ डब्यांना भीषण आग, दुर्घटनेत एकाचा मृत्यू; VIDEO VIRAL

साऊथ सुपरस्टार थलपती विजयने केली निवृत्तीची घोषणा, 'जय नायकन' शेवटचा सिनेमा असणार, म्हणाला...

Gold Rate Today : आठवड्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात घसरण; चांदीही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Maharashtra Cold Wave : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात पारा घसरला, विदर्भातील तापमान १० अंशाच्याही खाली...

SCROLL FOR NEXT