download 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची तर गंगाखेडला १९ जूलैपर्यंत संचारबंदी...

गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. परभणी शहरासह सर्व तालुक्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. आता बुधवार (ता.१५) जूलैपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. दिवसाकाठी रूग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवसांपूर्वी परभणी आलेल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी देखील कोरोना विषाणु संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता कठोर उपाययोजना राबविण्यात याव्यात असे आदेश जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यानंतर गंगाखेड शहरात कोरोना विषाणु संक्रमित रुग्णांचा आकडा वाढल्याने प्रशासनाने कडक पाउले उचलली आहेत. परभणी जिल्ह्याच्या सर्व नागरी भागासह संपूर्ण ग्रामीण भागातही संचारबंदी वाढविण्यात आली आहे. यापूर्वी (ता.१२) जूलै रात्री १२ वाजता संचारबंदीची मुदत संपणार होती. परंतू, रविवारी (ता.१२) दुपारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परत सुधारित आदेश काढून या संचारबंदीत तीन दिवसांची वाढ केली आहे. आता नवीन आदेशानुसार परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात (ता.१५) जूलैपर्यंत संचारबदीची अमलबजावणी अत्यंत कडक पध्दतीने केली जाणार आहे.

गंगाखेड शहरात १९ जूलैपर्यंत संचारबंदी
गंगाखेड शहरात शनिवारी रात्री व परत रविवारी सकाळी कोरोना विषाणु संक्रमीत रुग्णांची संख्या वाढल्याने गंगाखेड शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात (ता.१९) जूलैपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. गंगाखेड शहरात झालेल्या एका स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. या स्वागत समारंभास प्रशासनातील मोठे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच कार्यक्रमातून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या तालुक्यात अजून कोरोना विषाणु बाधित रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी (ता.१९) संचारबंदी लागू केली आहे.

संचारबंदीत यांना असेल सुट
शासकीय कार्यालय, त्याचे कर्मचारी व वाहने
सर्व दवाखाने, औषधी दुकान
अन्न वाटप करणाऱ्या सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते
पत्रकार, वर्तमानपत्र वितरक
पेट्रोलपंप, गॅस विक्रेते व त्यांची वाहने
दुध विक्रेते (वेळ सकाळी सहा ते नऊ)


प्रशासन सातत्याने प्रयत्न करतेय
नागरिकांनी कुणीही घराच्या बाहेर पडू नये. कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी तसेच कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. संचारबंदीच्या काळात कुणीही स्वतःच्या घराबाहेर पडता कामा नये.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी


कडक अंमलबजावणी केली जाणार 
जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीची पोलिसांच्यावतीने कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी.
- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी

(संपादन ः राजन मंगरुळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft Layoff: टेक क्षेत्रात पुन्हा मोठा धक्का! मायक्रोसॉफ्टने ४,८०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; एचआर प्रमुखांनी थेट कारणच सांगितलं

Raigad District Rain : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajgad Rain : राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील बालवड पूल पाण्याखाली; परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT