mukhed.jpg 
मराठवाडा

‘लाॅकडाऊन’च्या नावाखाली ग्राहकांची लूट

सुनील पौळकर


मुखेड, (जि. नांदेड) ः सध्या थैमान घातलेल्या काेराेनाच्या महामारीचा प्रतिबंध करण्यासाठी व त्याची साखळी ताेडण्यासाठी शासस्तरावरून लाॅकडाऊनचे निर्देश दिले असले तरी याचा गैरफायदा घेत काही किराणा व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरवात केली आहे. दाेन-चार दिवसात भाज्यांचे व दुपटीने वाढल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे
जगभरात पसरलेल्या वैश्विक महामारी काेराेना पाेचण्याअगाेदरच साखळी नष्ट करण्यासाठी देशभरात जनता कर्फ्यूनंतर लाॅकडाऊनची सुरवात करण्यात आली. सुरवातीला काहीशा संभ्रमात असलेल्या जनतेला हळुहळु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे बहुतांशी नागरीकांकडून दैनंदिन वापराच्या वस्तु खरेदीसाठी एकच गर्दी करण्यात आली. या मुळे पाेलिस प्रशासनाकडून कठाेर पावले उचलल्या गेली. नेमकी हीच बाब हेरून पुरवठा कमी असल्याचे कारण देत भाजीपाला विक्रेत्यांकडून ८० रूपये किलाेचा लसून १६० रूपये किलाे करत कांदे, बटाट्यासह भाज्यांचे दर दुपटीने वाढविले आहेत. तर किराणा सामानाच्या दरात सुद्धा वाढ झाली असून तुर दाळ, मुगदाळ, साखर, गाेडतेल यांच्या दरात दाेनच दिवसात क्विंटल मागेल दीडशे ते दाेनशे रूपयांची वाढ करण्यात आली आहे. (ता.१४) एप्रिल पर्यंत चालणाऱ्या लाॅकडाऊनमुळे अगाेदरच जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना अचानकपणे वाढत असलेल्या वस्तुंच्या दरामुळे जनता पुरती धास्तावली आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

गरजेच्या वस्तुंचा सुरळीत पुरवठा
या वेळी कोरोनाच्या संकटकाळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून अन्न धान्याचा मुबलक पुरवठा केला जात आहे. काेणत्याही वस्तुंचे अचानकपणे दर वाढविण्याची कसलीही आवश्यकता नाही. तसेच डाळी, तेल, साखर या दैनंदिन गरजेच्या वस्तुंचा सुरळीत पुरवठा हाेत आहे. यावरही काेणी साठेबाजी करून वाढीव दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठाेर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले. तसेच महामारीचा संसर्ग आपल्यामुळे आपल्या भागाला हाेऊ नये यासाठी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका व आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या अन्यथा नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई केली जाईल असे एन.जी. आकुसकर, पाेलिस निरीक्षक मुखेड यांनी सांगितले.


हँडवाॅश-सॅनीटाईजर बाजारातून गायब
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी वारंवार हात धुण्याच्या सूचना मिळताच बाजारातून नामांकीत कंपन्यांचे हँडवाॅश, तसेच सॅनेटाईजर मास्क गायब झाले असून काही माेजक्या जणांना अधिकचे पैसे दिल्यास देण्यात येत असल्याचे चित्र सध्या आैषधी दुकानात दिसत आहे. याबाबत अन्न व आैषधी प्रशानाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा -  पोलिसांच्या अनोख्या कारवाईने नागरिक हिरमुसले
शहर व परिसरात मागील दाेन आठवड्यात स्थलांतरीत झालेले मुंबई-पुणे येथील मजुरांचे आगमन झाल्यामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. याची दखल घेत संबंधित स्थलांतरीतांना उपजिल्हा रूग्णालयात तपासणी करून त्यांना विलगीकरणासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच बराेबर शहरामधील सर्वच मुख्य रस्ते, गल्ली बाेळांमध्ये निर्जंतुकीकरण आैषधी फवारणीचे काम चालु असल्याची माहिती मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT