DATTA JAYANTI 2020 
मराठवाडा

Datta Jayanti 2020: दत्ता दिगंबरा कोरोनाला लवकर घालव; उदगीरमधील भाविकांचं साकडं

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : हत्तीबेट (देवर्जन) ता. उदगीर येथील हत्तीबेट गडावर दत्त जयंती निमित्त श्री गंगाराम बाबा यांच्या समाधीची उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली.

येथील हत्तीबेट गडावर गेल्या अनेक वर्षापासून दत्त जयंती निमित्त मोठी यात्रा भरते मात्र यावेळी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच यात्रा रद्द करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क लावून शिस्तीमध्ये दर्शन घेण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी कोरोना परिस्थितीच्या सर्व नियमावलीची काळजी घेत दर्शन घेतले.

यावेळी मुख्याधिकारी श्री राठोड, सुमन राठोड, उदगीर आगाराचे आगार प्रमुख यशवंत कानतोडे, पुजारी गंगाराम गोसावी, व्ही एस कुलकर्णी आदीच्या उपस्थितीत गंगाराम बुवा समाधी पूजन करण्यात आले. गडावरील श्री दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे ही आरती करण्यात आली.

हत्तीबेट परिसरातील अनेक गावातील नियमित दर्शन घेणारे भाविक भक्त दत्त जयंती व पौर्णिमेनिमित्त मास्कचा वापर करत गंगाराम बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले व कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT