Death esakal
मराठवाडा

आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराने लेकीचा मृत्यू

आई गेल्याचे दुःख लेकीला अनावर

सकाळ डिजिटल टीम

परभणी : आईच्या निधनानंतर मुलीनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील फुलकळस (ता.पूर्णा) येथे घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गयाबाई सारंग स्वामी यांचे रविवारी (ता.सहा) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. डोंगरगाव (ता.लोहा) येथील मोठी मुलगी भागिरथी गंगाधर मठपती यांना त्यांच्या आईचे निधनाची माहिती देण्यात आली. त्या रविवारीच फुलकळस येथे पोचल्या. दुपारी आई गयाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सर्वजण घरी परतले. भागिरथी मठपती यांना आई गेल्याचे दुःख अनावर झाले. (Daughter Died After Mother Demise In Purna Taluka Of Parbhani)

त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी नांदेड (Nanded) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भागिरथी मठपती यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या गावी डोंगरगाव येथे सोमवारी (ता.सात) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT