Dayasagar Dadge, a farmer from Patoda Budruk, has planted bananas in two acres.jpg 
मराठवाडा

प्रेरणादायी:  दोन एकरमधील केळीच्या लागवडीतून कमावले चौप्पट उत्पन्न

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर) : पाटोदा बुद्रुक (ता.जळकोट) येथील शेतकऱ्यांनी प्रथमच आपल्या स्वतःच्या शेतातील दोन एकरमध्ये केळीची लावण केली. नऊ महिन्याचा खर्चा जाता निव्वळ साडेपाच लाखाचे उत्पन्न काढले.

शेतकरी दयासागर दाडगे यांनी एप्रिल २०२० मध्ये जि.नाईन या जातीच्या २४०० बुडाची लावण केली. त्यानंतर केळीचे दहा टँक्टर शेणखत, गांडूळ खताचा वापर करण्यात आला. सरिद्वारे पाणी दिले. विशेषतः स्वतः केळीची भट्टी घालून विक्री करत असल्याने उत्पादक ते शेतकरी या रितीने विक्री करत आहेत.

दरम्यान केळीची लावण केली, विक्री करण्यासाठी केळी हाताला आली. परंतु दलालाकडून बेभावांची मागणी होऊ लागली. त्यामुळे स्वतःच केळीची भट्टी लावून विक्री करत असल्याने दलालाच्या मागणी पेक्षा चौपट्ट उत्पन्न मिळत असल्याचे जळकोट येथील शेतकरी दयासागर दाडगे यांनी सांगितले.

गेल्यावर्षी पाऊस चांगला झाला. विहीर, बोअरला पाणी आले. साठवण चांगली झाली. तालुक्यात केळीची लागवड अत्यंत कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे आपण केळी लावून एक अगळी वेगळी लावण करावी, म्हणून केळीची लावण केली. लावण बघताना विक्रमी उत्तम होईल, अशी आशा होती.

एका केळीच्या झाडाला बारा डझन इतके फळ लागले होते. शेतकऱ्यांना केळी तोडून भट्टी लावणे व विक्री करणे हे होत नाही. त्यामुळे बाजारातील दोन-तीन दलालांना केळीची बाग बघण्यासाठी आमञंण दिले. तेही उत्साहाने पाहून भाव सांगत होते. एक क्विंटलला पाचशे रुपये देतो, म्हणून निघून गेले. शेतकऱ्यांनी दलालाचा मागितलेला भाव ऐकून चक्कर आली. दोन तीन दिवसानंतर एकटे बसून एका केळीच्या झाडाला किती डझन केळी आहे. एका डझनाला मार्केटमध्ये भाव किती आहे, यांचे गणित घातले.

सध्या बाजारात एक डझनाला ३० ते ४० रुपये भाव आहे. मग एका झाडाच्या १२ फणीचे किती रुपये होतात? यांचे गणित घातले तर एका झाडाचे ४८० रुपये होवू लागले. मग दलालाकडुन एका क्विंटलला ५०० रूपये मागत होते. एका क्विंटलमध्ये पाच केळीचे झाड बसत होते. हे लक्षात आल्यानंतर स्वतः शेतकऱ्यांनी २५ केळीच्या झाडाची भट्टी लावून स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यांना दलालाच्या भावापेक्षा चौपट भाव येत असल्याने केळीची लागवड केल्याचे सुख त्यांना मिळाले. शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची लागवड करुन स्वतः विक्री केल्यास विक्रीतून खर्च जाऊन चांगले उत्पन्न मिळते. 

तालुक्यातील अत्यंत कमी प्रमाणात केळी लावण केली जाते. त्यामुळे मी केळी लावण करण्याचा प्रयत्न केला. २४०० झाडाची लावण केली, फळही तसे लागले. स्वतः केळीची भट्टी लावून विक्री करत असल्यामुळे बागवानापेक्षा चौपट्ट उत्पन्न मला मिळत आहे. केळीच्या झाडाला रासायनिक खताचा कुठलाही वापर केला नाही. त्यामुळे खाण्यासाठी गोड आणि चविष्ट लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT