जप्त करण्यात आलेले वाहन
जप्त करण्यात आलेले वाहन 
मराठवाडा

तहसीलदारावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

देगलूर ः देगलूर तालुक्यातील बंद पडलेल्या वाळू घाटावरून अवैधरित्या वाळूची उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांना प्राप्त होताच त्यांनी कारवाईस्तव गेले असता वाळू माफियाकडून त्यांच्यावर
जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदरील घटना मंगळवारी (ता.१९) नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास जुना पेट्रोल पंपा समोर घडली. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली असून त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
देगलूर तालुक्यातील अधिकृत बाळू घाटावरून उपसा करण्याची मुद्दत गत दोन महिन्यापूर्वी संपली होती. तरीही वाळू माफियांकडून बेकायदेशीररित्या रेतीचा उपसा चालूच होता याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांना मंगळवारी (ता.१९) नोव्हेंबर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास समजताच त्यांनी कारवाई करण्यासाठी गेले. येथील जुना पेट्रोल पंप समोर सिद्धी बाबा सिद्धी खाजा व शेख अहमद यांनी गैर कायद्याची मंडळी जमा करून तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला.

या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळून त्यांच्यावर देगलूर पोलिस ठाण्यात हजर करून विविध कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल यंत्रणा निवडणूक कामात गुंतल्याचा फायदा घेत रॉयल्टी चोरांनी माती, दगड, रेती, खडी आदी गौणखनिजाची विना रॉयल्टी वाहतूक करून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाची हानी केल्याचे प्रकार समोर आला आहे. तसेच राज्यातल्या अनेक भागात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे तस्कर वाळूचा बेसुमार उपसा करत असतात. ही वाळू तस्करी रोखण्यासाठी धडाडीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरच असा हल्ला झाल्याने सध्या महसूल प्रशासनात भितीचे वातावरण पसरले आहे.
 


दादागिरी करण्याची वृत्ती बळावली ः
वाळू वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढतच असून सर्वसामान्यांवर त्यांची दादागिरी करण्याची वृत्ती बळावली आहे. एका वाळूच्या डम्परने काही महीण्यांपूर्वी हणेगाव परिसरात एका खासगी बसला धडक देत पोबारा केला. मात्र एका दुचाकी चालकाच्या समय सुचकतेमुळे तो डम्पर पोलिसांच्या हाती सापडला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT