A death in Udgir Latur dist
A death in Udgir Latur dist 
मराठवाडा

COVID-19 : उदगीरमध्ये कोरोनाचा सातवा बळी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) :  शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी (ता. एक) येथील कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या एका महिलेच्या चाचणीचा अहवाल आज (ता. जोन) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बळीची संख्या आता सातवर गेली आहे.

शहरातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीसवर पोचले आहे. सात रुग्णांचा आतापर्यंत बळी गेला आहे. शहरातील मोमीनपुरा भागातील एका 68 वर्षीय महिलेला अत्यवस्थ अवस्थेत एका खासगी रुग्णालयात नेले असता त्यांची परिस्थिती पाहून कोविड रुग्णालयाकडे या रुग्णाला वर्ग केले. तेथे दाखल करतात या महिलेचा मृत्यू झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिष हरिदास व कोव्हिड  रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

उदगीरच्या कोविंड रुग्णालयातून गुरुवारी (ता. एक) रोजी पाठवण्यात आलेल्या एकूण आठ स्वॅब पैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यातील मोमीनपुरा भागातील महिलेचा बुधवारी मृत्यू झाला असून एक नेत्रगाव तर दुसरा देगलूर रोड, परिसरातील नागरिकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.

उदगीर शहर व परिसरात आतापर्यंत एकूण एकशे सतरा रुग्णांची  नोंद झाली आहे. त्यापैकी यशस्वी उपचारानंतर एकूण नव्वद रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहे. पैकी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी उदगीरात दोन तर नेत्रगाव येथे एक अशा  एकूण नवीन तीन कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT