majalgao
majalgao 
मराठवाडा

माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

पांडुरंग उगले

माजलगाव (बीड) : यावर्षी अत्यल्प  पावसामुळे खरीप पिके हातची गेली तर, रब्बीची पेरणी झाली नसल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढावले आहे. यामुळे माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा. यासह इतर मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजीमंत्री प्रकाश सोळंकेच्या नेतृत्वाखाली बुधवारी परभणी फाटा येथे दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली. 

खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानी संदर्भात हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, गेल्या वर्षीचे बोंडअळीचे अनुदान तातडीने वाटप करावे, शेतीपंपाची लोडशेडींग बंद करावी. गेल्या वर्षीच्या खरीपच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या पिक विमा ची रक्कम खात्यावर तातडीने भरावी. भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या उपाय योजना कराव्यात.  माजलगाव धरणात जायकवाडी धरणातील ३ टी.एम.सी. पाणी सोडावे आदी मागण्यावर  त्वरित तोडगा काढण्यात यावा नसता सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी यावेळी दिला. 

या आंदोलनात बाजार समितीचे सभापती अशोक डाक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेचे मराठवाडा सरचिटणीस जयसिंग सोळंके, दीपक जाधव, जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले, वसीम मनसबदार, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत शेजुळ, दयानंद स्वामी, मनोज फरके , प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबुज, शरद चव्हाण, विश्वंभर थावरे आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT