आमदार राजू नवघरे
आमदार राजू नवघरे 
मराठवाडा

वसमतमध्ये 137 बेडचे डेडिकेटेड शासकीय रुग्णालय सुरु- राजू नवघरे

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वाढत्या कोविड संसर्गामुळे (Covid virus) रुग्ण व नागरिकांची मागणी लक्षात घेता आमदार राजू नवघरे (Mla Raju navghare)यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील 137 बेडच्या शासकीय डेडिकेटेड कोविड (Dedikated covid hospital) रुग्णालयाचे उद्घाटन सोमवार (ता. १७) आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते होऊन रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. (Dedicated Government Hospital of 137 beds started in Wasmat- Raju Navghare)

मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व वैद्यकीय सेवा कोलमडल्या. वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास बेडचे कोविड सेंटर असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कमी पडू लागले होते. परिणामी गोरगरीब रुग्णांची आर्थिक मानसिक व शारीरिक हेळसांड होऊ लागली. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला. कोरोना रुग्णांना शासकीय कोविड सेंटरमध्ये बेड व उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार- खासदार व जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातून शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात नवीन १३७ बेडचे अत्याधुनिक डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात आले.

हेही वाचा - जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार अरविंद बोळंगे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सनाउल्ला खान, डॉ. सौरभ मसारे, डॉ. गंगाधर काळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सदरील नवीन कोवीड सेंटरची बेड क्षमता १३७ असून सद्यस्थितीत ६० बेड कार्यान्वित असल्याचे डॉ. सनाउल्ला खान यांनी सांगितले. तसेच दाखल रुग्णांच्या उपचारासाठी बारा डॉक्टर व दहा वार्डबाॅय नियुक्त केले आहेत. यापुढे तालुक्यातील रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यास उपचारासाठी धावपळ होणार नसल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT