atm 
मराठवाडा

हातचालाकीने एटीएम बदलून लांबविले पैसे 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः शहरात एका अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देतो, म्हणून एटीएम कार्ड घेत ७५ हजार पळविल्याची घटना शनिवारी (ता.११) उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील जिजामातानगर येथील हुकूमचंद देविदास वाळले हे शुक्रवारी (ता.१०) सकाळी अकराच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. 

एटीएम कार्ड घेत पैसे दुसऱ्या खात्यात जमा
एटीएमच्या ठिकाणी हुकूमचंद देविदास वाळले यांना अनोळखी व्यक्ती भेटला आणि त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला श्री.वाळले यांनी एटीएमकार्ड दिले. त्याने पैसे काढून देतो असे हुकूमचंद यांना सांगितले. त्यांच्या जवळील एटीएम कार्ड घेऊन पैसे दुसऱ्या खात्यात जमा केले आणि त्याच्याकडील असलेले एटीएमकार्ड हुकूमचंद वाळले यांना परत दिले, आणि त्यांचे एटीएमकार्ड घेऊन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणाहून पसार झाला. ही बाब घरी गेल्यानंतर वाळले यांच्या लक्षात आली. तेंव्हा वेळ निघून गेली होती. परत दुसऱ्या दिवशी अनोळखी व्यक्तीने एकूण ७५ हजार रुपये एटीएममधून पळविले आहे.

बॅंक उघडल्यावर तपासाची चक्रे गतिमान होणार
हुकूमचंद वाळले यांची फसवणूक झाल्याने त्यांनी शनिवारी (ता.११) रोजी शहर पोलिसात पैसे लंपास झाल्याची तक्रार केली असून, अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश कांबळे करीत आहेत. शनिवारी बँक बंद असल्याने तपासकामी अडथळा निर्माण झाला होता. बँक उघडताच तपासाची चक्रे जलदगतीने फिरविल्यानंतर या अनोळखी व्यक्तीचा शोध लागणार आहे.

‘त्या’ अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
आखाडा बाळापूर ः हिंगोली ते नांदेड मार्गावर भाटेगाव शिवारात भरधाव वेगाने ट्रक चालवून ओव्हरटेक करून बसच्यासमोर अचानक ट्रक उभा केल्याने चालती बस ट्रकवर आदळल्याने बसचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात शुक्रवारी (ता.दहा) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बसचे चालक ज्ञानेश्वर गोपीनाथ लाडेकर राहणार घोडज (ता.कंधार जि.नांदेड) हदगाव आगार यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सहा प्रवासी जखमी तर वाहकाचा पाय फ्रॅक्‍चर  
हिंगोली ते नांदेड मार्गावर शुक्रवारी पहाटे ४.४५ वाजता भाटेगाव शिवारात जगदंबा धाब्याजवळ ट्रक क्रमांक (सी.जी.सात बीई ८८५५) चा चालक (नाव माहिती नाही) याने त्‍याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात व हलगर्जीपणे चालवून बस क्रमांक (एमएच १३ सीयु ६९८८) हिला ओव्हरटेक करून बस रोडने चालवत असलेल्या बसच्या दुसऱ्या लाइनच्या समोर ट्रक आणून ट्रकला अचानक ब्रेक लावले. ट्रकच्यासमोर कोणतेही वाहन किंवा अडथळा नव्हता, यामुळे बस ट्रकला पाठीमागुन आदळली. बसचे समोरचे नुकसान झाले व बसमधील प्रवासी जखमी होवून वाहकाचा उजवा पाय फ्रॅक्‍चर झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT