फोटो 
मराठवाडा

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १७ गोवंशाची सुटका 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अवैधरित्या कत्तल करण्यासाठी एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या दोन लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या १७ गोवंशाची सुटका करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी देगलूर नाका परिसरातील इम्रान कॉलनीमध्ये शुक्रवारी (ता. सहा) रात्री साडेअकराच्या सुमारास केली. यावेळी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 

शहरात काही भागात कायद्याने बंदी घातलेली असतांना गोवंशाची अवैधरित्या कत्तल केल्या जाते. गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा अशा अवैध कत्तलीकेड लक्ष ठेवून असते. तरीसुद्धा गोवंशाची कत्तल केल्या जाते. गोवंशाच्या कत्तली होउ नये म्हणून पोलिस अदीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या. पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांना शुक्रवारी (ता. सहा) रात्री गस्त घालण्यास सांगितले.

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १७ गोवंशांची सुटका

श्री. भारती हे आपल्या पथकाला घेऊन शहराच्या देगलूर नाका भागात गस्त घालत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली. यावरून त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवून अधिकचे पोलिस मागवून रात्री साडेअकराच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार इम्रान कॉलनी, खालेदबीन वलीद मशिदीच्या समोर, देगलूरनाका येथे कारवाई केली. यावेळी शेख निसार अहेमद शेख इस्माईल (वय ३२) याला ताब्यात घेऊन पत्र्याच्या शेडमध्ये अवैध्यरित्या कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १७ गोवंश (बैल व गोऱ्हे) आढळून आले. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारतींची कारवाई

पोलिसांनी डांबून ठेवलेल्या सर्व गोवंश आपल्या ताब्यात घेऊन इतवारा पोलिस पोलिस ठाण्यात दाखल केले. रात्रीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले सर्व गोवंश खडकुद (ता. नांदेड) येथील गोशाळेत जमा केले.

येथे क्लिक करामहापालिकेचा ६४५ कोटींचा अर्थसंकल्प, कोणत्या ते वाचा...
 
पथकातील हे आहेत कर्मचारी 

या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, कर्मचारी सलीम बेग, संजय केंद्रे, शेकर म्हैसनवाड, अफजल पठाण, बालाजी हिंगणकर, बालाजी यादगीरवाड, तानाजी येळगे, शेख कलीम यांनी परिश्रम घेतले. या पथकाचे पोलिस अधीक्षक श्री. मगर यांनी कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा कहर! १० जणांना चिरडले; २ ठार, ८ जण जखमी

IND vs ENG, 3rd T20I: पाऊस करणार गेम? भारत-इंग्लंड तिसऱ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो नॉटिंगहॅमचा हवामान अंदाज?

Latest Marathi News Update : भीषण अपघात! नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Nanded: गुंठेवारी प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार ऑनलाइन; नांदेड मनपाची डिजिटल कारभाराकडे मोठी झेप, गैरप्रकारांनाही आळा बसणार

भुदरगडमध्ये मॅग्नेटिक पॉइंट? उताराऐवजी चढाच्या दिशेनं जाते न्यूट्रल गाडी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT