फोटो 
मराठवाडा

चांदण्याच्या प्रकाशात या विभागाची सेवा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : किनवट तालुक्यातील परोटी येथे डाकपाल रवी वाडीकर हे लॉकडाउन व जमावबंदीमध्ये आपले कर्तव्य पार पाडीत असल्याचे दिसून येत आहे. परोटी गाव व परोटी तांड्यातील नागरिक बँकेच्या खात्यात पैसे जमा असून हतबल झाले होते. मात्र चांदण्या रात्री डाकसेवकांनी आपल्या टपाल बँकेत जमा झालेले खातेदारांचे पैसे घरपोच केले. 

या गावातील नागरिक सर्व शेती वर अवलंबून आहे. ही शेती निसर्गाच्या पाण्यावर आहे. कोरड वाहू शेती व मजुरी करून या गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालत असतो. सरकारने अन्न- धान्य व जेवनाची व्यवस्था गोरगरीब नागरिकांना केली. त्याचबरोबर गरीबाच्या खात्यात अत्यावश्यक वस्तू, दवाखान्यात उपचार भाजीपाला खरेदीसाठी जनधन, निराधार, अपंग, अंध, किसान सन्मान योजना, विधवा पेन्शन, जेष्ठ नागरिकांचे पेन्शन बँक खात्यात जमा केले. पण बँकेत जाता येत नाही. अशा परिस्थितीत पोस्टमन यांनी गावातील नागरिकांना तुम्ही घरीचं रहा ....सुरक्षित रहा..मी आपल्या बँकेचे पैसे घरपोच AEPS देतो असे गावात जाऊन जनजागृती केली.

कोणत्याही बँकेतील खात्यातील पैसे पोस्ट बँक मार्फत घरी

त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनधन व निराधार खात्यात जमा झालेले बँकेतील पैसे AEPS म्हणजे आधार एनेब्लड पेमेंट सर्व्हिस नागरिकांना कोणत्याही बँकेतील खात्यातील पैसे पोस्ट बँक मार्फत घर बसल्या नागरिकांना यांचा लाभ घेता येतो. पण बँकेतील खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.

चांदण्याच्या प्रकाशात आणि मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात वाटप

पोस्टमन वाडीकर यांनी बुधवारी (ता. २२) रात्री आठवाजेपर्यंत चांदण्याच्या प्रकाशात आणि मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात जनधन, निराधार, बँकेतील पैसे, विधवा पेन्शन, जेष्ठ नागरिकांचे पेन्शन AEPS व डाक विभागाच्या मायक्रो ATM मार्फत वाटप केले.

पैसे वाटप करीत असताना सोशेल डिस्टन्सिंग तंतोतंत पालन करत आहेत.

ग्राहकांना घरपोच मायक्रो ATM व AEPS द्वारे पैसे देण्याची सेवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.
लॉकडाउनमध्ये व्यवसाय, उद्योगधंदे जरी बंद आसले तरी भारतीय डाक विभाग संपुर्ण देशात निशुल्क डिजिटल पेमेंट पोस्ट बँकेमार्फत सेवा देत भारताची अर्थव्यवस्था मजबुत करण्यात डाक विभागाचा मोलाचा वाटा दिसुन येत आहे. 

घरीचं राहा..सुरक्षित राहा. घरा बाहेर येऊ नका. प्रशासनास मदत करा

नागरिकांनी बँकेतील पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करता आपले आधार कार्ड बँकेला जोडले असेल तर आपल्याला वाड्या, तांड्यात, ग्रामीण भागात, शहरात पोस्टमनमार्फत बँकेचे पैसे घरपोच मिळतात.
नागरिकांनी घरीचं राहा..सुरक्षित राहा. घरा बाहेर येऊ नका. प्रशासनास मदत करा. असे आवाहन डाक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT