deputy chief minister devendra fadanvis shashan aaplya dari in beed parali speech cm shinde ajit pawar knp94 eSakal
मराठवाडा

तुम्हाला बाजूच्या घरी कोणी बोलवत नाही; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त सरकारमधील महत्वाचे नेते परळी येथे एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्तिक पुजारी

बीड- शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त सरकारमधील महत्वाचे नेते परळी येथे एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले की, जिल्ह्यात आल्यास वैद्यनाथ आणि गोपीनाथ मुंडे अशा दोन नाथांचे दर्शन घेतलं.

गोपानाथ मुंडे यांच्या उर्जेमुळं आम्ही राजकारणात आहोत, असं फडणवीस भाषणाच्या सुरुवातील म्हणाले. बीडमधील १८ लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरत केंद्र सरकारसोबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हाला दुष्काळमुक्त करायचं आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देणार आहे, असं ते म्हणाले.

महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घर दिलं जात आहे. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकास कामासाठी मी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करुन आणणार आहे, असं ते म्हणाले.

आम्ही तिघं एकत्र आलो आहोत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाला लागला. आम्ही जेथे गेलो तेथे चांगला निकाल लागला. आम्ही बाहेर गेल्यामुळे आमच्यावर टीका करतात. दुसऱ्या राज्यात कशाला प्रचाराला गेला म्हणतात. तुम्हाला कोणी शेजारच्या घरी देखील बोलावतं नाही, आम्ही इतर राज्यात जातोय तर तुमच्या पोटात का दुखतंय असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

पुढच्या वेळी अजित पवार यांना देखील मी सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असं फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT