वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सन्नउल्ला खान हे मागील वर्षभरापासून कोरोना वार्डात सेवा देत आहेत. अनेक कोरोना रूग्णांना बरे करण्यात त्यांचा पुढाकार आहे.
वसमत (हिंगोली): तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. यातही रमजान महिन्यानिमित्त उपवास असतानाही डॉ. सन्नाउल्ला खान (Dr. Sanaullah Khan) कोरोना (Corona) वार्डात सेवा देत आहेत. त्याच्या सेवेमुळे कोरोनाबाधित रूग्णांना दिलासा मिळत असून ते रुग्णासाठी देवदूत ठरत आहेत. (Despite fasting for the month of Ramadan, Dr. Sanaullah Khan is serving in the Corona ward)
वसमत तालुक्यात कोरोना संसर्ग आजाराने कहर केला आहे. दररोज नवीन रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालये कोरोनाबाधित रूग्णांनी फुल्ल भरले आहेत. सलग वर्षभरापासून आरोग्य विभाग कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करीत आहे. अनेकांना कोरोना आजारालाही सामोरे जावे लागले आहे. मात्र तरीही डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत. वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सन्नउल्ला खान हे मागील वर्षभरापासून कोरोना वार्डात सेवा देत आहेत. अनेक कोरोना रूग्णांना बरे करण्यात त्यांचा पुढाकार आहे.
रमजान महिन्यानिमित्त त्यांना उपवास असतो. आताही ते रमजान महिन्यानिमित्त उपवास धरतात. तरीही ते नियमित कोरोना वार्डात रूग्णांना सेवा देत आहेत. पहाटे तीन ते चार वाजता उठून उपवास धरायचा. दिवसभर अन्नपाणी न घेता दिवसभर रूग्णांना सेवा द्यायची, असा त्याचा दिनक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांनाही कोरोनाने सोडले नाही. यात सहा महिन्याच्या त्यांच्या बाळालाही कोरोना आजाराला सामोरे जावे लागले. तरीही केवळ रूग्ण सेवा महत्वाची माणून ते कोरोना वार्डात सेवा देत आहेत.
एकीकडे खाजगी डॉक्टर कोरोना सारख्या आजाराच्या नावाखाली लाखो रूपये कमाई करीत असताना वैद्यकीय अधिक्षक डॉ. सन्नाउल्ला खान प्रामाणिकपणे कोरोना रूग्णांना विनामोबदला सेवा देत आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो रूग्ण कोरोनापासून बरे केले आहेत. आताही रमजान महिन्यात उपवास धरूनही ते सेवा देत असल्याने रूग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. (Despite fasting for the month of Ramadan, Dr. Sanaullah Khan is serving in the Corona ward)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.