Devendra Fadanis Calls Manoj Jarange patil  sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil: मोठी घडामोड, फडणवीसांचा जरांगेंना फोन अन्...; वाचा नक्की काय झाली चर्चा

Latest Maharashtra News: शेतकऱ्यांसाठी थोडे नियम बाजूला ठेवा, तुम्हाला शेतकरी भरभरून आशीर्वाद देईल असेही जरांगे म्हणाले.

Chinmay Jagtap

Latest Marathwada News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर वेळोवेळी टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना फडणवीसांनी फोन केला. त्यांनी केलेल्या या फोनची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.

राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे आज पहाटे तब्बल तीन तास चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची व फडणवीसांची फोन वरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ही चर्चा झाली. अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झालं असून त्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.अशी माहीती स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

यावेळी जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, त्यांना मी सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. गोरगरीब शेतकरी खचला आहे, त्यांना आधार देणं सरकारचं काम आहे.

आज कॅबिनेट बैठकीत आम्ही निर्णय घेतो असं फडणवीस म्हणाले असल्याचेही ते म्हणाले. तर शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी थोडे नियम बाजूला ठेवा, तुम्हाला शेतकरी भरभरून आशीर्वाद देईल असेही जरांगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Vande Bharat Train Accident : दसरा उत्सवावरुन परतणाऱ्या पाच तरुणांना 'वंदे भारत' ची धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Nilesh Ghaiwal: "सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Latest Marathi News Live Update: सरकारच्या निषेधार्थ सिल्लोड तहसील कार्यालयाच्या गेटला बांधले सडलेल्या पिकांचे तोरण

SCROLL FOR NEXT