Latur Municipal Commissioner News
Latur Municipal Commissioner News 
मराठवाडा

लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी देविदास टेकाळे यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी देविदास टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. टेकाळे हे सध्या नाशिक येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लातूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त एम.डी. सिंह यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते.

त्यात जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार होता. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. तो नियंत्रणासाठीच्या कामकाजाचे गांभीर्य, निकड विचारात घेऊन महापालिकेला पूर्णवेळ आयुक्ताची गरज होती. यातून नाशिक येथील जिल्हा प्रशासन अधिकारी देविदास टेकाळे यांची ता.२२ मे रोजी महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.टेकाळे यांनी बीड येथेही काही वर्षे काम केलेले आहे.

ईदनिमित्त गरिबांना मदत करण्याचे देशमुखांचे आवाहन
यावर्षीची रमजान ईद आज साजरी होत आहे. कोरोनामुळे उद्योग-व्यवसाय आणि बाजारपेठा बंद असल्यामुळे बऱ्याच जणांना रमजान ईदची खरेदीही करता आलेले नाही. या परिस्थितीत हा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. आपल्या गोरगरीब बांधवांना मदत करावी, असे आवाहनही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

‘कोविड १९’ आणि टाळेबंदीत सर्वांनी हा सण शारीरिक अंतर पाळून साजरा करावा. यावर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात ‘कोविड १९’ आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिल्या गेलेल्या सूचनांचे मुस्लिम बांधवांनी तंतोतंत पालन केले आहे. या काळात सर्वांनी एकत्र न येता घरीच नमाज अदा केली आहे. रमजान ईदची नमाजही अशाच पद्धतीने अदा केली जाणार आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करावी. या सणाच्या निमित्ताने गरिबांना मदत करावी, असे आवाहन करून श्री. देशमुख यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT