वाटूर (जि. जालना) : शेतातून श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेताना शेतकरी.  
मराठवाडा

काळ्या आईच्या कुशीतून म्या पाहिला विठ्ठल

एकनाथ राऊत

वाटूर (जि. जालना) - आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांसाठी अनुपम सोहळा. त्यातच वाटूर परिसरात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या श्री श्री ज्ञानमंदिराच्या प्रांगणात विठ्ठलाची तब्बल ५१ फुटी भव्य मूर्ती गतवर्षी उभारण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतशिवारांत कामे करतानाही आपसूकच नजरा वळतात कर कटेवरी ठेवलेल्या विठ्ठलाकडे आणि हात जोडले जातात. बुधवारीही (ता. एक) आषाढी एकादशीनिमित्त असेच चित्र होते आणि भाव होता  ‘काळ्या आईच्या कुशीतून म्या पाहिला विठ्ठल’चा.

जालना जिल्ह्यातील वाटूर येथे गतवर्षी आषाढीला ज्ञानमंदिराच्या प्रांगणात विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांची मांदियाळी जमत असे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाटूर येथील श्री श्री ज्ञानमंदिराचा परिसर प्रशासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. अर्थात, चार भिंतींच्या बाहेर आकाश कवेत घेणाऱ्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन परिसरातील शेतशिवारांतूनही सहज होते. त्यामुळे सकाळ शेतात येताना आणि सायंकाळी कामे आटोपून घरी परतणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थांचे हात जोडले जातात.

आषाढी एकादशीला बुधवारी श्री श्री ज्ञानमंदिराच्या प्रांगणात अतिशय मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सकाळी विठ्ठल मूर्तीची महापूजा करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले, असे व्यवस्थापक पुरुषोत्तम वायाळ यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री श्री ज्ञानमंदिराचा परिसर दर्शनासाठी बंद ठेवावे लागला आहे. घरीच विठ्ठलाचे नामस्मरण करीत आषाढी एकादशी साजरी करावी, असे आवाहनही आम्ही केले होते. त्यास भाविकांनी प्रतिसाद दिला. 
- गजानन वायाळ, 
प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT