ZP School Teacher News esakal
मराठवाडा

परळी : झेडपी शिक्षकाचं धनंजय मुंडेंकडून कौतुक

एका शिक्षकाची गोष्ट जो कोरोना काळातही विद्यार्थ्यांना खंड न पडता शिकवतोय. अशा धडपडणारे हजारो शिक्षकांची विद्यार्थ्यांना आज गरज आहे.

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील कासारवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची कोविडमुळे शाळा बंद असताना केलेल्या शैक्षणिक कामाची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेऊन कौतुक केल्याने शिक्षकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. येथील चंद्रशेखर फुटके हे तालुक्यातील कासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (ZP School) शिक्षक आहेत. फुटके यांची ओळख उपक्रमशील शिक्षक अशी आहे. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव करण्यात आलेला आहे. तालुक्यातील (Parli) ज्या जिल्हा परिषद शाळेत बदली होते. त्या गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत सुशोभित करणे, झाडे लावणे, शैक्षणिक (Education) साहित्य तयार करून गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश बंद झाल्याचा बोर्ड लागतो. दरम्यान कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना झुम क्लास व गुगल फॉर्म यांच्या मदतीने फुटके अभ्यास देत असतात.(Dhananjay Munde Appreciate Zilla Parishad Teacher Works In Parli Taluka Of Beed)

परंतु शाळा ही ग्रामीण भागात असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलांना आजही मोबाईल व इतर सुविधा उपलब्ध नाहीत. काही विद्यार्थ्यांना मोबाईल (Beed News) आहे तर त्यांच्याकडे नेट उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना कोविड विषयक नियमांचे पालन करुन त्यांच्या घरी जाऊन शाळा बंद होण्यापूर्वीचा दिलेला अभ्यास तपासत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना झूममध्ये दिलेला, गुगल फॉर्ममध्ये दिलेला अभ्यास नियमित करत आहेत का? याची तपासणी घरी जाऊन करत आहे. याच कामाची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दखल घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले आहे.

नव उपक्रम...

चंद्रशेखर फुटके व त्याच्या जिल्हा परिषद शाळेतील मित्रांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी शाळा बंद (Schools In Covid Pandemic) असल्याने मे २०२१ मध्ये महेश जाधव, प्राची जोशी यांनी मिळून पीडीएसई (प्लॅटफाॅर्म फाॅर डेव्हलपिंग स्पोकन इंग्लिश) हा प्रोग्राम सुरू केला होता. ज्याला महाराष्ट्रभरातून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद, मान्यवरांच्या मुलाखती, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रम आणि झूम वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन या कार्यक्रमाद्वारे केले जात आहे. तसेत सध्या गुगल फॉर्मच्या मदतीने फुटके हे विद्यार्थ्यांना अभ्यास देत असून ज्यात प्रश्न सोडवण्याची, प्रश्नांची उत्तरे तपासण्याची, चुकलेले मार्गदर्शन करण्याची सोय आहे. चंद्रशेखर फुटके यांचे स्वतःचे 'शेखर फुटकेज् अॅक्टिव्ह स्कूल' हे यूट्यूब चॅनल असून ज्यावर विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विविध व्हिडिओ आहेत. या चॅनलमधून मिळालेली सर्व कमाई दोन लाख रूपये आत्तापर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमासाठी खर्च केले आहेत. या संदर्भात फुटके यांनी मागणी केली आहे की, ग्रामीण भागात सध्या शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनी परवानगी द्यावी अशी माझ्यासारख्या अनेक शिक्षकांची इच्छा आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक

आमच्या परळी मतदारसंघातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. शेखर फुटके हे शाळा बंद असल्या तरी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना गृहपाठ देतात व दुसऱ्या दिवशी जाऊन तो गृहपाठ व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आढावा घेतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे शिक्षक इतक्या प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम करतात ही निश्चीतच इतरांसाठी प्रेरणादायी बाब आहे. असे शिक्षक नक्कीच आमच्या समाजासाठी आदर्श आहेत. फुटके सर, आम्हाला आपला अभिमान आहे, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फुटके यांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT