Dhananjay Munde
Dhananjay Munde 
मराठवाडा

Loksabha2019 : 'कमळाबाईच काही खरं हाय का'? धनंजय मुंडे

सकाळवृत्तसेवा

केज (बीड) : 'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का'? विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपरोधात्मक कविता त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट करत भाजपवर चांगलीच टिका केली. काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपने आयात केलेले उमेदवार, नगर  मधील विखे पाटील आणि मोहिते पाटील या बड्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मुलांना भाजप मध्ये दिला गेलेला प्रवेश या सगळ्यांवर या कवितेमध्ये टिका करण्यात आली आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे-राष्ट्रवादीवर टिका करताना शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं. असे ट्विट केले होते. यावरून मुंडे यांनी शेलार यांना अनेकदा टोला लगावला होता. आजच्या ट्विटमध्येही त्यांनी असाच टोला शेलार यांना लगावला आहे. 
 
राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना उद्देशून या कवीतेमध्ये मुंडे म्हणतात, आमच्या पक्षातून विझवलेल्या दिव्यांना घेऊन तुम्हाला त्याचा काही उपयोग आहे का? बीड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावने यांच्या प्रचार्था धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. आज दिवसभर नांदुरघाट, विडा, रायमोहा आदी ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा झाल्या. यातून वेळ काढत मुंडे यांनी ही कविता त्यांच्या ट्विटरवून पोस्ट केली आहे.  

कसं काय शेलार बरं हाय का?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली


वागणं तुमचं हाय रं गैर
ता तुमची नाय रं खैर
नेहमीच तुम्ही खेळतात कावे
य हाय उपयोग घेऊन विझलेले दिवे?
तुमच्या घरात त्याचा उजेड पडल काय?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT