Dhananjay Munde, Pankaja Munde
Dhananjay Munde, Pankaja Munde 
मराठवाडा

परळी (जि. बीड) : धनंजय मुंडे आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

परळी (जि. बीड) - पाहिल्या फेरीतील मतमोजणीत येथून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे.  पाहिल्या फेरीत साधारण नऊ हजार मतांची मोजणी झाली. त्यात धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यापेक्षा 499 मते अधिक घेतली. परळीत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात काट्याची लढत झाली. कथित क्लिप आणि गुन्हा अशी शेवटच्या दोन
दिवसांत ही निवडणूक गाजली.

राज्याचे लक्ष लागलेल्या आणि शेवटपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या आताच्या परळी आणि पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघावर 1978 पासून पंडितराव दौंड यांचा अपवाद वगळला तर मुंडेंकडेच आमदारकी राहिलेली आहे. पाच वेळा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि दोन वेळा दिवंगत रघुनाथराव मुंडे आमदार राहिले. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांचा सामना आहे. मागच्या वेळी पराभव झाल्यानंतर यावेळी धनंजय मुंडे ताकदीने मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर परळीत "पीएम येवो की सीएम, हवा फक्त डीएमचीच' (धनंजय मुंडे) असा विश्‍वास धंनजय मुंडे यांनी व्यक्‍त केला होता. कथित क्‍लीपवरून गुन्हा, भोवळ आणि अश्रुधारा असा या निवडणुकीचा शेवट झाला. आता परळी कोणत्या मुंडेंकडे जाते, याकडे लक्ष लागले आहे. 
 
झाले 70 टक्के मतदान
परळी विधानसभा मतदारसंघात सरासरी 70 टक्के मतदान झाले. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण-भावासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले. मतदानप्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली.  परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 335 मतदान केंद्रावर सोमवारी मतदान झाले. सकाळी अकरानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर मतदारांनी मोठी गर्दी केली. देशमुख टाकळी येथे महिलाराज होते. येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.

महाराष्ट्रात हायव्होल्टेज मतदारसंघ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात एकूण 16 उमेदवार नशीब अजमावत आहेत. प्रत्येक उमेदवाराने प्रचारकाळात आपापल्या परीने प्रयत्न केला. सोमवारी मतदारराजाने कोणाच्या पदरात आपले दान टाकले हे 24 तारखेलाच उघड होणार आहे. दरम्यान, विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा तीन टक्के अधिक महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT