dhanajay munde dhanajay munde
मराठवाडा

'पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे'

अशी मागणी यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भूजबळ यांनी केली होती

प्रमोद सरवळे

बीड: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउनही वाढवले आहे. १५ मे ला संपणारे लॉकडाउन १ जूनला सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवले आहे. अशात पत्रकार बांधवांना रोज काम करावे लागते. याकडे लक्ष वेधत मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही काळांत अनेक पत्रकारांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल आहे. पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे या मागणीचे पत्र धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहले आहे. अशी मागणी यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भूजबळ यांनी केली होती.

या मागणीची माहिती मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे. ट्विटमध्ये मुंडेनी लिहले आहे की, 'राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत. या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत @CMOMaharashtra यांना विनंती केली आहे'

राज्यात कोरोनाच्या रुग्णांत जरी घट झाली असली तरी वाढता मृत्यूदर चिंताजनक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने मृत्यूंची संख्या वाढत आहे. यामुळेच पत्रकारांचे लसीकरण लवकरात लवकर करावे अशीही मागणी मुंडे यांनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT