Akshay Padwal and alekzandra sakal
मराठवाडा

Dharashiv News : पडवळ पाटलांच्या घरात फॉरेनची पाटलीण!

उपळा (ता.धाराशिव) येथील पडवळ पाटील यांच्या घरात आता फॉरेनची लेक आता सून म्हणून गृहप्रवेश करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव - उपळा (ता.धाराशिव) येथील पडवळ पाटील यांच्या घरात आता फॉरेनची लेक आता सून म्हणून गृहप्रवेश करणार आहे. परदेशी पाहुण्यासाठी हा आगळा वेगळा लग्न सोहळा अनुभवता येणार आहे. अमेरिकाच्या फ्लोरीडातील वऱ्हाडी मंडळी त्यासाठी अत्यंत उत्सूक दिसत आहेत. शहरात सोमवारी (ता. सहा) विवाह सोहळा संपन्न होणार आहे. भारतीय परंपरेनुसार विधी केला जाणार आहे.

सामाजिक दृष्ट्या समाज सक्षम कधी बनतो, तर जातीच्या चाकोरीपेक्षा माणुसकीच्या नात्याला अधिक महत्व दिले जाते. धर्म, जात, देश यापेक्षा दोन प्रेम करणाऱ्या मनाचा विचार करुन पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची भूमिका बजावतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ही सामाजिक क्रांती ठरते. अशीच एक प्रेम कहानी आहे, येथील अक्षय पडवळ पाटील याची. आई सुनिता व वडील विलास पडवळ दोघे प्राध्यापक.

पहिल्यापासून अक्षय अभ्यासात एकदम अव्वल असायचा. दहावी, बारावीत त्याची चुणूक त्याने दाखवली. पुढे मॅकेनिकल अभियांत्रिकी पदवीच्या शिक्षणासाठी मुंबई, तेथून २०१६ साली तो पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी अमिरेका येथील फ्लोरीडा विद्यापीठात गेला. शिक्षणानंतर तिथे त्याला जॉबच्या अनेक ऑफर आल्या. त्यातील एकाची निवड करुन नोकरीही सुरु केली.

इकडे आई - वडीलांना आपला मुलगा मोठा होत आहे, हे पाहून त्याचा लग्नाचा बार उडवून द्यायचा विचार देखील सुरु केला. मात्र या अगोदरच अक्षयच्या मित्र कंपनीमध्ये असणाऱ्या अलेक्झॅन्ड्राने अक्षयची विकेट घेतली होती. एकत्र असल्याने सहवासातून मैत्री व पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

प्रेमासाठी निमित्त मात्र कोरोना ठरल्याचे अक्षय सांगतो, लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नसल्याने एकत्र राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकमेकाचे स्वभाव गुण - अवगुण लक्षात आले. व शेवटी घरातील पालकांच्याही गोष्ट लपून राहिली नाही. लग्नाचा निर्णय घेताना प्रत्येक पालकांना जशी काळजी वाटते, अगदी तशीच स्वाभाविक प्रतिक्रिया त्याच्यातून उमटल्या. पण अत्यंत धाडसाने आई - वडील व नातेवाईकांने अक्षयच्या लग्नाला पसंती दर्शवली.

मुळात त्या दोघांनाच त्यांचा संसार करावा लागणार आहे, सज्ञान झाल्यानंतर दोघांनी एकमेकाची जोडीदार म्हणून निवड केल्यास आपली पालकांची भूमिका पार पाडणे एवढेच काम असते. त्यात दोघांनीही रितसर पालकांची परवानगी घेऊन प्रस्ताव ठेवल्याने त्याला नकार देण्यासारखे काहीच नव्हते.

- प्रा. विलास पडवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT