Nanded News 
मराठवाडा

धर्माबाद पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त

सुरेश घाळे

धर्माबाद (जि.नांदेड) : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता. २० जानेवारी २०२०) रोजी होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुत्तेदार मोईजोद्दीन करखेलीकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या २१ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी १४९ च्या नोटीसा देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 

यामुळे घेतली खबरदारी
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सहा जानेवारी रोजी होती. परंतु , गुत्तेदार मोईजोद्दीन करखेलीकर यांनी आपल्या गाडीत पाच जानेवारी रोजी पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य मारोती कांगेरू यांना घेऊन तेलंगणा राज्यात गेले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून मारोती कांगेरू यांना बाहेर काढताच गुत्तेदार गाडी घेऊन पळून गेला. त्यामुळे निवडणूक वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते.

२१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
सहा जानेवारी रोजी शिवसेनेचे सदस्य मारोती कांगेरू यांना पंचायत समितीसमोर मतदानासाठी जाण्याच्या अगोदर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाश रेड्डी येताळकर, संघटक गणेश गिरी व शिवसैनिकांनी मारोती कांगेरू यांना पक्षाचा व्हिप देण्यासाठी हट्ट धरला. यावेळी पोलिस, भाजपा व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. सदरील कारणावरून पोलिसांनी गुत्तेदार मोईजोद्दीन करखेलीकर यांच्यासह २१ जणांना १४९ च्या नोटीसा देऊन पायबंद केले आहे.

यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाश रेड्डी येताळकर, संघटक गणेश गिरी, माजी शहरप्रमुख राजू शिरामणे, शिवसेनेचे शहरप्रमुख अनिल कमलाकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ताहारी पाटील चोळाखेकर, संचालक गोविंद पाटील रोशनगावकर, नगरसेवक निलेश पाटील बाळापुरकर, राजू सुरकूटवार, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ताहेर पठाण, बालाजी पाटील कारेगावकर, हनमंत नरवाडे यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे. 

कारवाईची होतेय उलट-सुलट चर्चा
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी पंचायत समितीच्या परीसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परीसरात पंचायत समितीचे सदस्य व कर्मचारी शिवाय कोणालाच येण्याची परवानगी नसणार आहे. परंतु पोलिसांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनाच नोटीसा दिल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उलट सुलट चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे. सहा जानेवारी रोजी पंचायत समिती समोर झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ पाहूनच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT