diesel E Sakal
मराठवाडा

वाढती इंधन दरवाढ, त्यात डिझेल चोरी वाढली अन्

मागच्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी पार्किंगमध्ये उभे असलेले ट्रक, टेम्पो व इतर वाहनांचे डिझेलच्या टाकीचे लॉक तोडून त्यातील डिझेल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली शहरातील विविध भागांत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनातील डिझेल चोरून विक्री करणारी टोळी शहर (Hingoli) पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून दीडशे लिटर डिझेल व एक क्रुझर वाहन बुधवारी (ता.१३) जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहरात मागच्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी पार्किंगमध्ये उभे असलेले ट्रक, टेम्पो व इतर वाहनांचे डिझेलच्या टाकीचे लॉक तोडून त्यातील डिझेल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. शहरातील एनटीसी भागातील शेख जुबेर शेख जावेद यांनी त्यांचा टेम्पो हा ता. २८ सप्टेंबर रोजी उभा केला होता. एक ऑक्टोबरला सदर टेम्पोमधील दीडशे लिटर डिझेल (Diesel Theft) चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली होती.

यावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील शिवाजी जुमडे व गोपाल ढवळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून दीडशे लिटर डिझेलसह चोरी करिता वापरण्यात आलेली क्रुझर गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT