file photo 
मराठवाडा

डिजीटल संकल्पनेला मरगळ! ... कशामुळे ते वाचा 

नवनाथ येवले

नांदेड : शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या अंगणवाडी केंद्रांतून बालकांना शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी भौतिक सुविधांवर भर देण्यात येत आहे. गावपातळीवर लोकसहभाग आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्ह्यातील १४७ अंगणवाड्या आयएसओ मानाकंन प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या पोषण अभियानांतर्गत एक हजार २३० अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत. दरम्यान, सर्वच तीन हजार दहा अंगणवाड्यांचा कारभार पेपरलेस असला तरी हक्काची इमारत नसलेल्या जिल्ह्यातील ८९४ अंगणवाड्यांसाठी डिजिटल संकल्पना मात्र दुय्यम आहे.

खासगी इंग्रजी शाळांच्या नर्सरीशी स्पर्धा करण्यासाठी शासन स्तरावरून पोषण अभियानांतर्गत आदर्श अंगणवाड्यांचे धोरण अवलंबिण्यात येत आहे. जिल्ह्यात एकून तीन हजार दहा अंगणवाड्यांपैकी ८९४ अंगणवाड्यांना अद्याप हक्काची इमारत नसल्याने जागेअभावी सोईनुसार किरायाच्या जागेत, ग्रामपंचायत कार्यालयात, शाळेत, समाजमंदिरात भरत आहेत. त्यानुसार एकूण अंगणवाड्यांमध्ये दोन लाख पाच हजार बालके शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. हक्काच्या इमारतींमधील दोन हजार ११६ अंगणवाड्यांपैकी लोकसहभागातून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने १४७ अंगणवाड्या आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाण) प्राप्त झाल्या आहेत.

हेही वाचा - पालकांनो, मुलांकडे द्या लक्ष...
 
लोकसहभागाचा वाटा महत्वाचा
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या एकीकडे चांगल्या पद्धतीने काम करत असतानाच दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. सुसज्ज, देखण्या शाळा उभारून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. पण शासनाच्या पोषण अभियानांतर्गत गावपातळीवर लोकसहभागातून अंगणवाडीतील सुविचार, शाळेची इमारत, बोलक्या भिंती, फ्री स्कूल एज्युकेशन (पूर्व प्राथमिक शिक्षण), भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, बाहेरील खेळ, सौर अभ्यासिका, अत्याधुनिक परसबाग, पेपरलेस रेकॉर्डसाठी लोकसहभागाचा वाटा उचलण्यात येत असल्याने अंगणवाडीसाठी लोकसहभागाची डिजिटल संकल्पना कृतीत उतरत आहे.

ग्रामपंचायती सरसावल्या
अंगणवाडीची डिजिटल संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी अंगणवाडी केंद्रात लागणाऱ्या भौतिक सुविधांमध्ये नळ कनेक्शन, वीजपुरवठा, पंखा, एलसीडी, डिजिटल बोर्ड, मॅट, बेंच, कपाट, टेबल, खुर्ची, फिल्टर, गॅस, प्रेशर कूकर, आहार शिजविण्याची भांडी, प्लेट, चमचे, ग्लास, बादली, पिंप, रॅक्स, फिल्टर, आहार, परसबाग, झोपाळा, घसरगुंडी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

येथे क्लिक करा मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
 
‘आयएसओ’साठी आवश्यक
फ्री स्कूल एज्युकेशन (पूर्व प्राथमिक शिक्षण) मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची पूर्वतयारी आवश्यक आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. तिन्ही भाषेतील बडबड गीते बालकांना म्हणता आली पाहिजेत. अंगणवाडीमध्ये सौर अभ्यासिका बसविलेली असली पाहिजे. बोलक्या भिंती डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अंकगणित, प्राणी, फळे, भाजीपाला, बाराखडी, इंग्रजी अक्षरे, महिने, वारांची नावे, भूमितीय आकृत्या, फुले, वजन-मापे, झाडांची नावे आदींचे तक्ते भिंतीवर डिजिटल करून बसविण्यात आले आहेत. रंगरंगोटी केली आहे. महापुरुषांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

‘आयएसओ’साठी निकष
अंगणवाडीतील मुलांची सरासरी ९० टक्के उपस्थिती आवश्‍यक आहे. तसेच पूर्वप्राथमिक शिक्षण (फ्री स्कूल एज्युकेशन) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हायला हवी. भौतिक सुविधेमध्ये सौर अभ्यासिका, स्वच्छ परिसर व सुंदर शाळा, विशेष उपक्रम कृती, कुटुंब नियोजन कार्यक्रमात विशेष सहभाग व बालविवाह प्रतिबंध उपक्रमात लोकसहभाग अनिवार्य आहे.

ग्रामपंचायतींची साथ 
जिल्ह्यातील ८९४ अंगणवाड्यांपैकी दोनशे अंगणवाड्या इमारतींना मनरेगा अंतर्गत, तर २२० अंगणवाड्यांच्या इमारतींना जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळाल्याने ४२० अंगणवाड्यांचा इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. प्रत्येक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी लोकसहभागाला आता ग्रामपंचायतींची साथ मिळाली आहे.
- एस. व्ही. शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT