dhrmabad.jpg 
मराठवाडा

आठशे गरजू कुटुंबांना भरविला मायेचा घास

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब कुटुंब तसेच गरजूंची मोठी अडचण होत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील नुसरत कन्स्ट्रक्शन कंपनीचे मोईज सेठ करखेलीकर (बिडीवाले परिवार) यांच्या तर्फे ‘अन्न वाटप अपल्या दारी’ हा उपक्रम राबवित ग्रामीण भागातील ८०० गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट घरपोच देऊन मदतीचा हात समोर केला आहे.

देशात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी धर्माबाद शहरातील गरजवंतांसाठी मदतीचा हात समोर केला आहे. परंतु, लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात गरजूंकडे कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे हातावर पोट असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पोटाला चिमटा बसत आहे. हे दृश्य मोईज सेठ करखेलीकर यांनी आपल्या डोळ्यांनी पाहून संकट काळातही सामाजिक भान जपत ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी ‘अन्न वाटप आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.

उपक्रमाचे ग्रामीण भागात कौतुक
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील करखेली, जुन्नी, पांगरी, राजापूर, चिकना या पाच गावांत सर्व्हे करून गरजू कुटुंब व गरजवंतांसाठी ८०० परिवाराला २०० क्विंटल घरपोच अन्न वाटप मंगळवारी (ता. २१) तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बिडीवाले परिवार नेहमी सामाजिक व संकट काळात पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासतो. बिडीवाले परिवारातर्फे ‘अन्न वाटप आपल्या दारी’ या उपक्रमात पाच गावांतील आठशे गरजू कुटुंबांना २५ किलो बीपीटी तांदूळ, मूगडाळ एक किलो, चणाडाळ १ किलो, तूरडाळ एक किलो, गोडेतेल एक किलो, मिरची अर्धा किलो, हळदपावडर शंभर ग्रॅम, मीठ अर्धा किलो, संतूर साबण दोन, कपडे धुण्याची साबण दोन असे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे घरपोच वाटप करण्यात आले.


‘अन्न वाटप आपल्या दारी’ 
तसेच दुसऱ्या टप्प्यात जारीकोट व येताळा या गावांतही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मोईज सेठ करखेलीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तू रेड्डी जुन्नीकर, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत वाघमारे, बाजार समितीचे संचालक दत्ताहरी पाटील आवरे, मोहम्मद एनोद्दीन, मोहम्मद इकबाल, अब्दुल लतीफ यांच्यासह बिडीवाले परिवार उपस्थित होते. संकट काळात सामाजिक भान जपत नुसरत कन्स्ट्रक्शनचे मोईज सेठ करखेलीकर यांनी राबवित असलेल्या ‘अन्न वाटप आपल्या दारी’ या उपक्रमाचे ग्रामीण भागात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आवेश खानच्या अतिउत्साहाने फिरवलं असतं रिषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; पण SRH च्या चूक लक्षातच आली नाही अन्...

29 वर्षाचे रजनीकांत 16 वर्षांच्या अभिनेत्रीशी करणार होते लग्न; ‘त्या’ एका अपशकुनामुळे तुटली स्वप्नांची दोरी!

Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

सलमानचा अंगरक्षक शेराची हायकोर्टात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी, प्रकरण काय?

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीमुळे सोनं स्वस्त! महिन्यात 13 हजारांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT