शेतकरी 
मराठवाडा

शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत... अधिकारी म्हणतात मेला

प्रकाश काळे

किल्लेधारूर (जि. बीड) - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यास महसूल प्रशासनाने ऑनलाईन नोंदीत तुम्ही मृत असल्याचे स्टेटस दाखविले. आपण तर जिवंत आहोत आणि हा काय प्रकार? असा प्रश्‍न शेतकऱ्याला पडला. मनस्ताप झालेल्या या शेतकऱ्याने हा प्रकार चव्हाट्यावर आणून न्याय मिळण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले. 

शहरातील अनुपकुमार गणेशप्रसाद मिश्रा यांच्या नावे शेतजमीन आहे. चार डिसेंबरला त्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्‍यक कागदपत्रासह ऑनलाईन फॉर्म भरला; परंतु त्याची पडताळणी करून अर्ज मंजूर होऊन त्यांच्या बॅंक खात्यावर रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे ते तहसील कार्यालयात गेले.

त्यांना पैसे मिळण्याबाबत अडचणी काय आणि त्रुटी काय? याचे समर्पक उत्तर देण्याऐवजी ऑनलाईन नोंदीत मृत असल्याचा स्टेटस रिपोर्ट हाती देण्यात आला. संबंधित कारकून कानावर हात ठेवून रिकामा झाला; पण हा प्रकार ऐकून अनुपकुमार मिश्रा यांना धक्काच बसला.

अनुप मिश्रा यांनी आधार कार्ड दाखवून ज्यांनी वा यंत्रणेने मृत्यू प्रमाणपत्र दिले, त्याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. तरीही यंत्रणा समाधान करू शकली नाही. यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रातील थंडी कमी होणार? राज्यात पावसाची शक्यता

प्रेयसीने साथ सोडली, त्याने जिद्द सोडली नाही! ७ वर्षांच्या संघर्षानंतर UPSC मध्ये मिळवला २३८ वा क्रमांक, कोण आहे आयुष कृष्णा?

Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या गच्चीवर पार्टी, समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल, जिल्ह्यात खळबळ

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल अधिक गडद; धुळ्यात पारा १०.४ अंशांवर, तर रत्नागिरीत तापमानाने गाठला ३६.१ अंशांचा टप्पा

IND vs NZ, 5th ODI: विदर्भाच्या खेळाडूचं पदार्पण, सिराजलाही संधी, मग Playing XI मधून कोण झालं बाहेर? भारताला मालिका विजयाची संधी

SCROLL FOR NEXT