Nanded News
Nanded News 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रांचे होतेय विघटन ः कसे ते वाचा

प्रमोद चौधरी

नांदेड : गुरुद्वारा, कंधारचा भुईकोट किल्ला, माहूरगड असी ऐतिहासिक पर्यटनस्थळांची देणगी नांदेड जिल्ह्याला लाभलेली आहे. पण शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची बुद्धी अजून एकाही राजकारण्याला आलेली नाही. पर्यटनाचा विकास केला तर स्थानिक पातळीवर उत्तम रोजगारनिर्मिती होऊ शकते. तसेच शहर व परिसराचे ऱ्हास पावत चाललेले पर्यटन सुधारण्यासही मदत होईल. शहराचा पर्यावरणपूरक आराखडा बनवून, पर्यटनविकास आराखडा तयार करण्याची आज वेळ येवून ठेपली आहे.

पर्यटनाचा वारसा होतोय नेस्तनाबूत
आंतरराज्य पर्यटन असो किंवा शहरातील पर्यटन विकास असो, नांदेड शहरात सर्व सोयीसुविधा असूनही पर्यटन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने शहरातील पर्यटनाची पार वाट लागली आहे. क्षुल्लक विकासनिधीच्या तरतुदीमुळे येथील बगिचे, ऐतिहासिक गड, किल्ले व अभयारण्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. थेंबभर पाणी, साफसफाई नाही; यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उपलब्ध असलेला पर्यटनाचा वारसा नाकर्त्या अधिकाऱ्यांमुळे नेस्तनाबूत होऊ लागला आहे. शिवाय शहरातील उद्याने तर नामशेष झाली आहेतच. त्यामुळे एकेकाळी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या अनेक स्थळांकडे आता पावलेही वळत नाहीत. कुणी आलेच तर क्षणभर थांबतही नाही आणि विशेष म्हणजे पर्यटकांना थांबण्यासाठी व्यवस्थाही नाही, अशी अवस्था जिल्ह्यातील ऐतिहासिक वारस्यांची झाली आहे. 

विकासाची आश्‍वासनेही गुलदस्त्यातच
प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रात  शहर मोठ्या प्रमाणात वाढले, त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला. शहरात काही वर्षांपूर्वी आजूबाजूच्या जिल्ह्यांतून शाळा व महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली येत असत. पण आता पूर्वीसारखे पर्यटन क्षेत्रात सुधारणा दिसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल नांदेडकडे नसल्याचे समजते. संबंधित अधिकाऱ्याकडून पर्यटन विकासासाठीचा ठेका देण्यात आला. पण कामे मात्र दूरच आणि आश्‍वासनेही गुलदस्त्यात पडून आहेत. तसे पाहिले तर दरवर्षी पर्यटनासाठी लाखो रुपये खर्चून काही निविदाही काढल्या असतीलच. कदाचित असे असेल, की आपल्या मर्जीतीलच लोकांना ते ठेके दिले असणार...आता हा मुद्दा शोधून काढणे म्हणजे ‘दशम्या’ खाऊन गेलेल्या ‘बाबा’विरुद्ध शोध मोहीम राबवण्यासारखे झाले आहे. सध्या शहरातील पर्यटनाला अवकळा आली असून, देखभालीसाठी रक्कम नाही. रक्कम नाही म्हणून सुविधा नाहीत. सुविधा नाहीत म्हणून पर्यटक नाहीत. पर्यटक नाहीत म्हणून शहरातील पर्यटन मृत्युशय्येवर आहे. एकूणच शासन आणि पर्यटन अधिकारी मात्र झोपा काढतायत, हे मात्र खरे.

आता तरी लक्ष देणार का?
नांदेड शहरात सर्व सोई सुविधा असूनही, पर्यटन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील पर्यटनाची पार वाट'लागली आहे. शहरातील पर्यटन क्षेत्रात ऊर्जिताअवस्था आणण्यासाठी खास प्रयत्न करावेत, अशी शहरवासीयांकडून मागणी होत आहे. निसर्गस्थळापासून ते पर्यटनस्थळापर्यंत सध्या सर्व जागा या कचऱ्याच्या प्रदूषणाने ग्रस्त झाल्या आहेत. कागद, प्लास्टिक, बाटल्या, काचा अशा नाना प्रकारच्या कचऱ्यामुळे आपल्या अनेक पर्यटनस्थळांची दुर्दशा झाली आहे. या साऱ्यांवर मात करून प्रदूषण निर्मूलनाचे काम अनेक सामाजिक संस्थांनी हाती घेवून निसर्गस्थळाविषयी जनजागरणही करण्यात यावे.

तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
महाराष्ट्रात पर्यटनविकासाला प्रचंड वाव असून, शेतीनंतर पर्यटन हा मोठा व्यवसाय मानला जातो. नांदेड शहरात निसर्गसंपन्न जागा, प्राणी-पक्ष्यांनी नटलेली किनवटची अभयारण्ये, ऐतिहासिक वारसा सांगणारे गड-किल्ले आहेत. शेतीनंतर पर्यटन हा मोठा व्यवसाय असून, त्याचे विविध पातळ्यांवर मार्केटिंग होणे महत्त्वाचे आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात असून त्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्यातूनच गुंतवणूक वाढत नाही. पर्यटन विभागाच्या माहितीनुसार असे समजते, की जेव्हा एक पर्यटक येतो, तेव्हा साधारणपणे १० लोकांना रोजगार मिळतो. हा विचार जेव्हा स्थानिक प्रशासन करेल तेव्हाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

शासन आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची उदासीनताच पर्यटनाकडील दुर्लक्षाला कारणीभूत आहे. आतापर्यंत शासनाने करोडो रुपये खर्च केले, पण कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने ते सर्व पाण्यात गेले. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष व क्षुल्लक विकासनिधीच्या तरतुदींमुळे पर्यटन स्थळांची अशीच दयनीय अवस्था जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची झालेली आहे.
- डॉ. प्रा. चंद्रशेखर पटवर्धन (इतिहासतज्ज्ञ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT