hingoli photo 
मराठवाडा

वापरलेल्या मास्‍कची ‘डिस्‍पोज मित्रा’ लावणार विल्‍हेवाट

राजेश दारव्हेकर

हिंगोली : नागरिकांनी वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी यांनी डिस्‍पोज मित्रा उपकरण तयार केले असून वापरलेले पंधरा मास्‍क आणून देणाऱ्या नागरिकांना होममेड सॅनिटायझर भेट देण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क लावत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत असली तरी वापरलेले मास्क नागरिक कुठेही फेकून देत असल्याचे चित्र आहे. यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आता वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे. 

मास्क नष्ट करण्यास मदत

यावर मात करण्यासाठी हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी एक यंत्र तयार केले असून वापरलेले मास्क नष्ट करण्यास मदत होत आहे. पुष्यमित्र जोशी यांनी या यंत्राला ‘डिस्‍पोज मित्रा’ असे नाव दिले आहे. या यंत्राद्वारे एक ते दोन तासात एक ते दीड किलो मास्‍कची विल्‍हेवाट लावता येते.

सॅनिटायझरही घरीच तयार केले

 यासाठी घरोघरी जाऊन मास्‍क गोळा करण्याची सुरवात त्‍यांनी केली असून त्यांना मित्रही साथ देत आहेत.  विशेष म्हणजे नागरिकाने पंधरा मास्‍क दिल्यानंतर त्‍यांना होममेड सॅनिटायझर मोफत दिले जात आहे. हे सॅनिटायझरही त्यांनी घरीच तयार केले आहे. त्‍याच्या उपक्रमाला हनुमान व्यायाम शाळा, हिंगोलीचा राजा मित्र मंडळ व साई माऊली विद्यालयाचे सहकार्य मिळत आहे. 

मित्रपरिवारांची मदत

तसेच वापरलेले मास्‍क गोळा करण्यासाठी रोहित चित्तेवार, अरविंद चित्तेवार, श्रीकांत चोंढेकर, प्रथम मुदीराज, मानव चित्तेवार, गजानन पवार आदी मदत करीत आहेत. उपक्रमाला माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, पांडुरंग लुंगे पहिलवान, कृष्णा लुंगे पहिलवान यांनी शुभेच्‍छा दिल्या आहेत.

उत्‍कृष्ट वैज्ञानिक पारितोषिक

पुष्यमित्र जोशी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात एम. एस्सीचे शिक्षण घेत आहेत. भारतीय विद्यापीठ संघटनेतर्फे आयोजित स्‍पर्धेत डिस्‍पोज मित्रा या उपकरणाचे सादरीकरण केले होते. तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे २०१९ मध्ये झालेल्या १३ व्या अविष्कार राज्यस्‍तरीय वैज्ञानिक संमेलनात उत्‍कृष्ट वैज्ञानिक पारितोषिक मिळाले होते.

 संशोधनाचे सादरीकरण

 तसेच संशोधनासाठी राज्यपालांची (फेलोशिप) देखील मिळाली आहे. दरम्यान, संगमनेर येथे आंतरराष्‍ट्रीय वैज्ञानिक परिषदेत त्‍याने या उपकरणावर आधारित संशोधनाचे सादरीकरण केले होते. याबद्दल त्‍याला उत्‍कृष्‍ट युवा वैज्ञानिक पुरस्‍कार मिळाला आहे. मेहसाना (गुजरात) येथे २०१८ मध्ये आयोजित स्‍पर्धेतही त्‍याला पुरस्‍कार मिळाला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक, कोल्हापुरात जाऊन घेतलं देवीचं दर्शन, VIRAL VIDEO

Hasan Mushrif Statement : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच, हसन मुश्रीफांनी ६ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना दिली होती माहिती

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यातील चिखला गावात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुन्हा उभारला; शेकडो शिवभक्तांची उपस्थिती

Ro-Pax: रो-पॅक्स सेवा खरंच परवडणारी? भाडे विमान तिकिटापेक्षा जास्त, डोळे फिरवणारे तिकीट दर पहाच...

Panchang 22 February 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT