hanegav.jpg 
मराठवाडा

शंभर गरीब कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप

उमाकांत पंचगल्ले


हनेगाव, (ता.देगलूर, जि. नांदेड) ः कोरोना वैश्विक महामारीमुळे सर्व कामे ठप्प झाले आहेत. या मुळे गरीब कुटुंबांना मोठ्या संकटाशी सामना करावा लागत आहे. याची जान ठेऊन बालाजी इंगळे पाटील मित्र मंडळ खुतमापूर यांच्या वतीने हणेगाव विभागातील गरीब शंभर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करून संकट काळात गरिबांना मदत करण्यासाठी धावून आले आहेत.


मजूरकार-कामगार यांचे काम बंद
कोरोना नावाचा विषारी संसर्ग भारत देशात पसरताच केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. या मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले, देवाण-घेवाण बंद झाला, मजूरकार-कामगार यांचे काम बंद झाले. ज्यांचा उघड्यावर संसार आहे, ज्यांचा हातावर पोट आहे असे कुटुंब मात्र आज पोटाला काय खावे मुला-बाळांना कसे पोसावे असा मोठा प्रश्न हणेगाव विभागातील अनेक गरीब कुटुंबाना पडला असतानाच बालाजी इंगळे पाटील हे एक देवरूपी अवतार याभागात अवतरले व गरीब व सर्व सामान्य कुटुंब हे हाताला काम नसल्याने उपाशी पोटी राहू नये यासाठी आपल्या स्व खर्चातून गावो-गावी अन्नधान्याची टेम्पो घेऊन आपल्या मित्र मंडळाची साथ घेत सोसिअल डिस्टन्स ठेवत शिस्त बद्ध पद्धतीने झरी-टाकळी येथील वडार समाज, हणेगाव येथील उघडयावर असलेले कुटुंब, रस्त्यावर गिट्टी फोडणाऱ्या कुटुंबियांना असे शंभर गरीब कुटुंबाना अन्नधान्य, तेलाचे पाकीट, भाजीपाला असे जीवनावश्यक ध्याण्याचे वाटप करण्यात आले.


आग लागून लाखो रुपयाचे नुकसान 
अशा संकट काळात इंगळे पाटील यांच्या हातून मोफत अन्नधान्याचे वाटप झाल्याने अनेक वृद्ध महिला, निराधार महिला, उपाशीपोटी जीवन जगत असलेले कुटुंब आनंदाने भारावून गेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे हणेगाव परिसरात इंगळे पाटील यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी देखील इंगळे पाटील यांनी संकट काळात अनेकांना धावून येऊन मदत केली आहे. रमतापूर येथे गिरी महाराज यांच्या घराला शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाला होता. या वेळी इंगळे पाटील यांनी धावून येऊन गिरी महाराज यांना १०० किलो तांदूळ, ५० किलो गहू, पाच किलो तेल, तीन किलो साखर व इतर संसार उपयोगी वस्तू देऊन पाच हजार रुपये चा धनादेश दिला. या मदतीमुळे रमतापूर गावात इंगळे पाटील यांची मोठी प्रशंसा होत आहे.


कोरोना या बीमारीमुळे अनेक गरीब कुटुंबाना जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या मुळे हणेगाव विभागातील गावागावातील वाडी तांड्यातील गरजू, गरीब कुटुंबाना अन्नधान्य मदत देण्याचे कार्य चालूच राहणार असल्याचे इंगळे पाटील यांनी सांगितले. या मदत कार्यात बालाजी इंगळे पाटील खुतमापूरकर, बालाजी चोपडे, डॉ.व्ही. व्ही. पाटील, शिवाजी पाटील, मारोती बडगे, अनिल वलकले व इतर मित्र मंडळी यांचे सहकार्य लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : नागपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT