file photo 
मराठवाडा

...अन् जिल्हाधिकारी, सहकार अधिकारी   बनले वऱ्हाडी !

कैलास चव्हाण

परभणी : शासनाने कर्ज माफ केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांना मुलीच्या विवाहाचे आमंत्रण दिले होते. अधिवेशनामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊ शकले नसल्याने शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी  गुरुवारी (ता. पाच)  पिंगळी (ता., जि. परभणी) येथे वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहात शेतकऱ्याच्या निमंत्रणाचा मान राखला.

नुकतीच राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत आधार प्रमाणीकरासाठी पायलट चाचणीसाठी परभणी जिल्ह्यात पिंगळी (ता. परभणी) व गिरगाव (ता.सेलू) या दोन गावांची निवड झाली होती. या दोन्ही गावांतील पात्र लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ता. २५ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला होता. या दरम्यान, पिंगळी येथील लाभार्थी शेतकरी विठ्ठलराव रुस्तुमराव गरुड यांनी संवाद साधताना कर्जमुक्ती योजनेत आपले एक लाख १५ हजार ८७५ रुपयांचे कर्ज माफ झाले असून मी चिंतामुक्त झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मुलीच्या विवाहास यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. 


पिंगळी येथे विवाह सोहळा
त्यानुसार गुरुवारी (ता. पाच) पिंगळी येथे श्री. गरुड यांच्या मुलीचा विवाह पार पडला. या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अधिवेशनामुळे येऊ शकले नाहीत.  मात्र, त्यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, औरंगाबाद विभागाचे सहनिंबधक योगीराज सुर्वे, अतिरिक्त  जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा उपनिंबधक मंगेश सुरवसे, सहायक निबंधक उमेशचंद्र हुसे, कार्यालय अधीक्षक बी. एस. नांदापूरकर यांनी पिंगळी येथे विवाहास उपस्थित राहात  वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. खुद्द जिल्हाधिकारी आल्याने वधू-वरांसह वधुपिता भारावून गेले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT