file photo 
मराठवाडा

प्रभाग, विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महापालिकेच्या सर्व अकरा सभापतिपदांसाठी गुरुवारी (ता. ३०) अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे सभापतिपदांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (ता. एक) निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जावून अधिकृतपणे नावे जाहीर केली जातील.

परभणी महापालिकेच्या अ, ब व क या तीन प्रभाग समित्यांसह आठ विषय समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रत्येक पदासाठी एकाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनादेखील मानाचे पान दिले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेला मात्र, एकही सभापतिपद मिळालेले नाही. तर भारतीय जनता पक्षाकडून संख्याबळ नसले तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात औपचारिकता म्हणून अर्ज दाखल केले जातील, असे अपेक्षित होते. परंतु, तसे काहीही झालेले नाही.

स्थायी समितीच्या सभापतिपदी गुलमीरखान
महापालिकेत सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक गुलमीरखान कलंदरखान यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे या प्रभागाला हा बहुमान सलग दुसऱ्या वेळेस मिळाला. याच प्रभागाचे सुनील देशमुख यांच्यानंतर गुलमीरखान यांची या पदावर वर्णी लागणार आहे. प्रभाग समिती ‘अ’च्या सभापतिपदासाठी श्रीमती राधिका शिवाजी गोमचाळे, ‘ब’ साठी सय्यद समरीन बेगम फारूख, ‘क’ साठी नम्रता संदीप हिवाळे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले.

बालकल्याणसाठी माधुरी बुधवंत
गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापतिपदासाठी नागेश सोनपसारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी माधुरी विशाल बुधवंत, स्थापत्य समितीच्या सभापतिपदासाठी गवळण रामचंद्र रोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतिपदासाठी अब्दुल कलीम अब्दुल समद, विधी समितीच्या सभापतिपदासाठी ॲड. अमोल पाथ्रीकर, शहर सुधार समितीच्या सभापतिपदासाठी शेख फरहत सुलताना शेख अ. मुजाहेद, तर शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी विकास प्रभाकर लंगोटे यांनी एकमेव अर्ज दाखल केले. या सर्व उमेदवारांनी नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्याकडे अर्ज दाखल केले. त्यांना मुकूंद कदम, रमेश चव्हाण, अब्दुल वहिद यांनी सहकार्य केले.उमेदवारांनी अर्ज दाखल करते वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, रवींद्र सोनकांबळे, गणेश देशमुख, फारूखबाबा, अक्षय देशमुख, अ‍ॅड. मुजाहेद खान, मो. नईम, विश्वजित बुधवंत, बाळासाहेब बुलबुले, नागनाथ काकडे, डॉ. खिल्लारे, सचिन देशमुख, बबलू नागरे, अमोल जाधव, ईमरान झैन आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा -  नांदेडात हायप्रोफाईल मटका अड्डा उद्धवस्त ​

सत्ताधाऱ्यांकडून ‘राष्ट्रवादी’ला मानाचे पान
सत्ताधारी काँग्रेसपक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनादेखील सत्तेत वाटा देऊन मानाचे पान दिले आहे. त्यामध्ये नम्रता हिवाळे, ॲड. अमोल पाथ्रीकर, गवळण रोडे व विकास लंगोटे यांची सभापतिपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभापतिपदांसाठी नावे निश्चित झाल्याची माहिती असून उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला व महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे यांचे समर्थक, सहकाऱ्यांची सभापतिपदावर वर्णी लागल्याचे दिसून येते. तसेच सर्व गट-तटांना सामावून घेण्याचाही त्यातून प्रयत्न झाल्याचे दिसते.

तिघांना सभापतिपदाची दुबार संधी...
गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापतिपदासाठी विद्यमान सभापती नागेश सोनपसारे व विधी समितीच्या सभापतिपदासाठी विद्यमान सभापती ॲड. अमोल पाथ्रीकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित असून त्यांना दुबार संधी मिळणार आहे. तर विद्यमान शिक्षण सभापती अब्दुल कलीम अब्दुल समद यांनी आरोग्य समितीच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तेथे त्यांची निवड निश्चित आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

IND vs SA, 3rd T20I: भारतीय गोलंजांचा अचूक माऱ्यासमोर द. आफ्रिका १२० धावांच्या आतच ऑलआऊट; भारतासमोर सोपं टार्गेट

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT