Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News 
मराठवाडा

शिवसेना नेत्याने चिखलात केली पिकांची पाहणी

जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : अमळनेर (ता.गंगापूर) येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी परिवहनमंत्री   दिवाकर रावते यांनी मंगळवारी (ता.19) शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.


श्री. रावते यांनी येथील शेतकरी रमेश मिसाळ यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कपाशी  पिकाची चिखलात पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्या सोबत बसून नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे झाले की नाही, याची अद्यावत माहिती तलाठी, ग्रामसेवक, कृषि सेवक यांच्याकडून सविस्तर जाणून घेतली. तसेच जे पंचनामे करायचे राहिले असतील ते तात्काळ करावे असे सांगितले.


यावेळी किती शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ मिळतो याची शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता केवळ 20 टक्केच लोक या योजनेत समाविष्ट आहे आणि 80 टक्के शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. तसेच 2016 मध्ये झालेल्या शेतकरी कर्ज माफीत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला असे विचारले असते तर शेतकऱ्यांना नाही म्हटले. यात केवळ गावातून मोजकेच शेतकरी बसले असे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांना माजी मंत्र्यांना सांगितले की,राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली. ती 80 रुपये गुंठा पडतो. ती मदत शेतकऱ्यांसाठी चेष्टा आहे.त्या 8 हजार रूपये मध्ये  प्रति एकरी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बी बियाणे आणि ट्रॅक्टर मशागतीचा ही निघणे शक्य नाही.शेतकऱ्यांना किमान शासकीय नुकसान भरपाई हेक्टरी 50 हजार रुपये मिळावे अशी मागणी केली.सोबत अतिवृष्टीने व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जायकवाडी जलफुगवटा क्षेत्रात संपादित नाही, अशांच्या शेती पिकात गोदावरी पुराचे पाणी येऊन मोठे नुकसान झाले. त्यांचे ही प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून लवकरात-लवकर मदत कार्य करून शेतकऱ्यांना न्याय दिलासा द्यावा अशी मागणी केली.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख , तथा आमदार अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, युवासेना तालुका प्रमुख मचिंद्र देवकर, उपतालुका प्रमुख पोपटराव गाडेकर,नगरसेवक अविनाश पाटील ,राजू वैद्य, डॉ. आबासाहेब सिरसाट,कल्याण गायकवाड, अमळनेर सरपंच जिलानी पठाण,माजी उपसरपंच रमेश मिसाळ,शिवाजी भणगे,इसा पठाण,समद पठाण,ग्रामसेवक विजय वांढेकर,तलाठी रघुवीर वायचळ, मंडळ अधिकारी व्ही.बी.मोरे, कृषी सहायक शाम काळे, सरपंच कैलास पवार, काकासाहेब दुबिले,हशिवाजी मिसाळ, राजुभाई पठाण, राजेश मिसाळ , राधेश्याम कोल्हे, गजानन गायकवाड, राजेंद्र गावंडे, बाबासाहेब भरपुरे , राफायल साळवे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         


तुटपूंजी मदत                             
माझ्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. हा अहवाल मी वरीष्ठांकडे देणार आहे. सरकार आल्यावर धोरणात्मक दृष्ट्या निर्णय घेऊ. सरकार लोकांनी निवडून दिलेल्या आमदार संख्या प्रमाणे नक्की होणार आहे. शिवसेनेच्या माध्यमा शिवाय कोणतेच सरकार येऊ शकत नाही. सरकार म्हणजे आता राज्यपाल आहे. आम्ही हेकटर 25 हजार रुपयांची मागणी केली होती. राज्यपालांनी हेकटर आठ हजार दिली. ती मदत तटपुंजी आहे. नुकसान मधून कोणी वगळता कामा नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावे यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT