'Diwali Donation Festival' was organized in Parbhani on the occasion of Diwali with HIV children.jpg
'Diwali Donation Festival' was organized in Parbhani on the occasion of Diwali with HIV children.jpg 
मराठवाडा

परभणीत वंचित बालकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा ‘दिवाळी दान महोत्सव’

गणेश पांडे

परभणी : बारा वर्षांपासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित बालकांना दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थेतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून या वंचित मुलांना मदत केली जाते. यंदाही कोरोनामुळे लॉकडाउन असला तरी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हे ही वाचा : मराठवाडा पदवीधर निवडणूकीचा बिगुल वाजला; एक डिसेंबरला होणार मतदान, जिल्ह्यात १६,२७६ मतदार
 
यंदा कोरोनामुळे एका विशिष्ठ संस्थेपुरते उपक्रम मर्यादित न ठेवता समाजातील २२० वंचित, अनाथ, एचआयव्ही संक्रमित बालकांसोबत दिवाळीनिमित्त ‘दिवाळी दान महोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत एक ते नऊ नोव्हेंबर दरम्यान २२० वंचित बालकांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात रविवारपासून झाली.

एआरटी विभागात दान महोत्सवचे आयोजन

सोमवारी एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेणाऱ्या १०० वंचित, एक पालक, निराधार मुला मुलींना या दिवाळी किटचे वाटप करण्यासाठी एचएआरसी टीमने ही किट वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले. बालकांना या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये दिवाळी किटमध्ये पाच प्रकारचे फराळ, डेटॉल साबण, हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, मुलींची सौंदर्य प्रसाधने, सॅनिटरी पॅड, ब्लॅंकेट, टॉवेल, शेंगदाणे चिक्की, मावा चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पॉवडर, पेन, पेन्सिल, शॅम्पु, आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या, शेंगदाणे लाडू बरणी आदी साहित्यांचा समावेश आहे. 

निराधार विधवा महिलेला शिलाई मशीन

यंदा दिवाळीत निराधार, एचआयव्ही संक्रमित विधवा ताईची दिवाळी चांगली जावी आणि त्यांना उदरनिर्वाहचे साधन मिळावे म्हणून स्वयंरोजगारच्या दृष्टीने एचएआरसी संस्थेतर्फे शिलाई मशीन सुपूर्द करण्यात आली.

तीन वंचित मुलांना स्मार्टफोन
 

लॉकडाऊनमुळे शाळा कॉलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण पर्याय आहे. पण काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे वंचित राहावे लागते. अशा तीन गरजू एक पालक, एचआयव्ही मुलांना चांगल्या स्थितीतील तीन स्मार्टफोन संस्थेतर्फे देण्यात आले. याशिवाय चाईल्ड लाईन परभणीच्या नेटवर्कमधील ३० पालक, निराधार मुलांना व सेतू चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या नेटवर्कमधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ३० वंचित मुलांना देखील दिवाळी किटचे वाटप करण्यात येत आहे. 

परभणी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक म्हणाले, समाजातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना स्वावलंबी होण्यासाठी व स्वयंरोजगार व प्रशिक्षणासाठी सर्वप्रकारची मदत एचएआरसी संस्थेतर्फे पुरविली जाईल. सर्व रुग्णांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नियमितपणे उपचार, पोषक व संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT