File Photo
File Photo 
मराठवाडा

डॉक्टर मला वाचवा ‘कोरोना’ झाला, असे म्हणत २१ वर्षाचा मुलगा...

शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील २१ वर्षाच्या ‘अमोल’ला ताप आल्याने तो मेडीकल वरून गोळी आनायला गेला. मेडीकल दुकानदाराने सहज ‘कोरोना’ आजाराविषयी सांगितले आणि अमोल ‘कोरोना’च्या भीतीने भेदरल्याने घामाघूम झाला. यानंतर तो नांदेडच्या डॉक्टरकडे गेला डॉक्टर काही बोलण्याच्या आतच तो ओरडला, सर मला ‘कोरोना’ झाला, मला कोरोना झाला, मी आता मरणार....मला वाचवा. असा प्रसंग नांदेड जिल्ह्यात घडला असून याची चर्चा ठिकठिकाणी होत आहे.

दोन दिवसात ताप झाला कमी 
याबाबत माहिती अशी, सदरिल युवक नांदेडला तपासणीसाठी गेला असता डॉक्टरने त्याला पाणी प्यायला देऊन शांत केले. सोबत आलेल्या बहिणीला विचारले काय झाले? ती म्हणाली, दोन आठवड्यापूर्वी ठिक होता. तिने मेडिकलवर घडलेला प्रसंग सांगितला. त्या प्रसंगाची भीती त्याच्या मनात संचारली, आई त्याला या अवस्थेत पाहून आश्चर्यचकित झाली. तो तिच्या कुशीत शिरून रडू लागला. आई मला कोरोना झाला, मी मरणार. घरचे त्याची समजूत काढत होते पण तो काही ऐकेना. शेवटी घरच्यांनी त्याला एका नामांकित फिजीशियनकडे नेले. गोळ्यांनी दोन दिवसांत त्याचा ताप कमी झाला.

भितीच्या ‘मानसिक’ आजार’ झाले निदान
पण ‘कोरोना’चा विचार त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हता. झोप उडाली, भूक मंदावली, इंटरनेटवर सारखा ‘कोरोना’च्या लक्षणाबदल वाचन करायचा, टीव्हीवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या बघून त्याचे डोके सुन्न व्हायचे. घरच्यांनी वारंवार सांगून सुद्धा त्याच्या मनाचे समाधान होत नव्हते. पुन्हा त्यास फिजीशियनकडे घेऊन आले, डॉक्टरनी त्याला तपासले. ‘कोरोना’ काय साधी सर्दी खोकल्याची लक्षणे सुद्धा त्याला नव्हती. पण त्यांनी त्याच्या मनाची स्थिती ओळखली अणि मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्याला ‘आजाराच्या भितीचा ‘मानसिक’ आजार’ असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याच्या डोक्यात २४ तास या आजाराचे विचार घोळत आहेत. सध्या त्या युवकाची तब्येत चांगली असून त्याला डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या औषध सुरू आहेत.

शंकेचे निरसन करावे
काही वर्षापूर्वी लोकांना क्षयरोग, एड्स सारख्या दूर्धर आजाराबद्दल प्रचंड भीती वाटत असे. अगदी त्याचप्रमाणे आता लोकांमध्ये ‘कोरोना’बद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हळव्या मनाच्या लोकांनी अफवा आणि सोशल मीडियावर विश्वास न ठेवता या आजाराबद्दलची अफवा असेल तर डॉक्टरकडून आपल्या शंकेचे निरसन करावे.

-डॉ. रामेश्वर बोले (मानसोपचार तज्ज्ञ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT