file photo
file photo 
मराठवाडा

विनयभंगप्रकरणी डॉक्टरचा अटकपूर्व जामिन फेटाळला 

प्रल्हाद कांबळे

नांदड : उपचारासाठी गेलेल्या एका तरूणीचा त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरने विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याच्यावर किनवट पोलिस ठाण्यात विनयभंग व अट्रॉसीटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याने अटक टळावी म्हणून नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन टाकला. मात्र त्याचा अर्ज जिल्हा न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी शुक्रवारी (ता. २८) फेटाळून लावला. 

किनवट येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बालाजी दयाराम नागरगोजे याचे रुग्णालय आहे. त्यांच्याकडे किनवट येथील एक तरूणी उपचारासाठी गेली होती. परंतु तिचा डॉ. नागरगोजे याने विनयभंग केला होता. एवढेच नाही तर तीच्या पर्समध्ये त्याने बळजबरीने ६०० रुपये टाकले होते. डॉक्टरने केलेल्या चाळ्याची तक्रार पिडीत मुलीने किनवट पोलिस ठाण्यात दिली होती. 

अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

त्यावरून डॉ. बालाजी नागरगोजे याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंग व अनुसुचीत जाती - जमाती प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच डॉ. नागरगोजे हा पसार झाला. अटकेपासून बचाव होण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन टाकला. परंतु न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. त्यामुळे डॉक्टरच्या अडचणीत भर पडली आहे. 

आॅनलाईन मटका बुकीवर छापा

नांदेड : आॅनलाईन मटका बुकीवर पोलिसांच्या विशेष पथकाने केल्या कारवाईत दहा जणांना अटक करून त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अर्धापूर येथे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी केली. 

जिल्ह्यात मटका, जुगार या अवैध धंद्याविरुद्ध पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कंबर कसली आहे. मटका व जुगार जिल्ह्यात चालणार नाही त्यामुळे त्यांनी अनेक मटका माफियांना कारागृहात पाठविले. तरीसुद्धा गल्लीबोळात मटका जुगार सुरूच आहे. या जुगारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. पोलिस अधीक्षक श्री. मगर यांनी आपल्या पथकामार्फत जिल्हाभरात अशा अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश पुरी यांच्या पथकानी अर्धापूर शहरात सुरू असलेल्या आॅनलाईन मटका ( फन गेम ऐसा) यावर जुगार सुरू होता. 

हे आहेत जुगारी

पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काही जुगारी पसार झाले. तर दहा जणांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. त्यात सचीन मारोतराव येवले, संदीप चंदु जोगदंड, रवि देविदास लोणे, शेख सगीर शेख मुस्तफा, ओमकार शाहूराज सोनटक्के, काशिनाथ लंगडे, आनंदराव मारोतराव शेटे, विष्णु गुलाब राठोड आणि रवि अशोक गोरे यांचा समावेश आहे. सहाय्यक फौजदार गणेश पुरी यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे करत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT