मराठवाडा

Video: घाबरु नका; खबरदारी घ्या : जिल्हाधिकारी

गणेश पांडे

परभणी : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अर्लट करण्यात आले आहे. यासाठी विशेष कक्ष म्हणून महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील आरोग्य केंद्रही यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात १० खाटांचा कक्ष सुरु करण्यात आला आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बुधवारी (ता.११) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंकुश पिनाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री. नागरगोजे आदी प्रमुख उपस्थित होते.


 रेल्वे, बसस्थानकावरुन खबरदारीचे निर्देश द्या
कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी शहरात होर्डिंग्ज लावून तसेच रेल्वेस्थानक, आकाशवाणी केंद्र व बसस्थानकावरुन नागरिकांना खबरदारी घेण्याचे निर्देश द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, महोत्सव याबरोबरच पालिका हद्दीतील आठवडी बाजार तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. जिल्ह्यातील एकुण ५ व्यक्ती या दुबईवरुन आल्या असून त्यांची प्राथमिक तपासणी करुन नमुने प्रयोगशाळेत पाठविले असून विशेष कक्ष म्हणून महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एरंडेश्वर येथील आरोग्य केंद्रही यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बायोमेट्रीक उपस्थिती प्रणाली ही तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार आहे.

हेह वाचा -मध्य रेल्वेमधील लाईन ब्लॉकचा काही रेल्वेंना फटका


जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम लागू
जिल्ह्यात आपत्तीजन्य परिस्थिती उदभवू नये यासाठी पुर्वतयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. आपत्तीची पुर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी इंन्सिडंट कमांडर म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागरगोजे (९४२२७४४८५०) आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खंदारे (९७६७१९१०७३) यांना सनियंत्रण म्हणून आदेशित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी (९९७५०१३७२६) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


जिल्ह्यात एकही रुग्ण नाही
जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी वारंवार हात धुवावेत, शिंकतांना व खोकतांना तोंडावर रुमाल वापरावा तसेच परिसरात स्वच्छता ठेवावी आणि हस्तांदोलन व यात्रा, महोत्सव आदी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Hong Kong Open 2025 : आयुषचा जागतिक पदक विजेत्याला धक्का; पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी; राष्ट्रपती भवनमध्ये सोहळा

MHADA Lottery Pune 2025: म्हाडाची ६१६८ घरांसाठी सोडत जाहीर; पुणे व पिंपरी चिंचवड शहर, ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Asia Cup 2025 : आता पुढचं ‘लक्ष्य’ पाकिस्तान; संयुक्त अरब अमिरातीला नमविल्यानंतर कशी असेल भारताची तयारी?

SCROLL FOR NEXT