file photo 
मराठवाडा

दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका- सहाय्यक कामगार आयुक्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने ता. १८ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, कोठेही गर्दी करु नये व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकाम बंद झाले आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांनी सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची तजवीज करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने ता. १८ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यातील काही दलाल सक्रिय झाले 

नांदेड जिल्ह्यातील काही दलाल सक्रिय झाले असून घरोघरी जाऊन कामगारांना सांगत आहेत की, तुमचे पैसे येणार असून तुम्ही यासाठी पाचशे रुपये आम्हाला द्या व तुमचे कागदपत्रे द्या असे बोलून ठगत आहे. असे कोणी कामगारांस ठगत असेल तर त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाणे येथे बांधकाम कामगारांनी करावी. सध्या देशात ता. तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून संबंधीत नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) कामागरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे, रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुख्यालयातून टाकण्यात येणार आहेत.

सहाय्यक कामगार आयुक्तांचे आवाहन

यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये व सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT