औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पदभार डॉ. कोंडय्या जोनलगड्डा यांच्याकडून स्विकारताना नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. कोल्लुरु व्यंकटा सोमनाथा सर्मा.
औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पदभार डॉ. कोंडय्या जोनलगड्डा यांच्याकडून स्विकारताना नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. कोल्लुरु व्यंकटा सोमनाथा सर्मा. 
मराठवाडा

एमएनएलयू औरंगाबादच्या कुलगुरुपदी डॉ. कोल्लुरु व्यंकटा सोमनाथा सर्मा

अतुल पाटील

औरंगाबाद - औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. कोल्लुरु व्यंकटा सोमनाथा सर्मा यांची निवड झाली. डॉ. सर्मा यांनी मंगळवारी (ता. 20) प्रभारी कुलगुरु कोंडय्या जोनलगड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला. 

डॉ. कोल्लुरु व्यंकटा सोमनाथा सर्मा (केव्हीसी) हे तेलंगणामधील नलसार राष्ट्रीय विधी विद्यापीठ येथे 20 वर्षांपासून वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच ते कंझ्युमर आणि कॉम्पिटेशन लॉ विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय कार्पोरेट आणि कमर्शियल लॉ विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. सर्मा यांनी हैदराबाद येथील निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात विधीतज्ञ म्हणून काम केले आहे. कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारताना प्रभारी कुलसचिव डॉ. अशोक वडजे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT