उजनी (जि.लातूर) - औसा-तुळजापूर महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात दोन ट्रकचा अपघात; चालक ठार, एक गंभीर जखमी

केतन ढवण

उजनी (जि.लातूर) : उजनी (ता.औसा) (Ausa) येथील औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरणा नदीच्या पुलावर सोमवारी (ता.२०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका मालवाहतूक ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने (Accident In Ausa) मोठा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये माठीमागुन धडक देणाऱ्या ट्रक चालकाचा मृत्यु, तर त्यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. अण्णावीरया हिरेमठ ( वय २३) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. तो कर्नाटक राज्यातील कन्नोळी रहिवाशी होता. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक (एमपी ०७ एच बी ७५७८) हे सोलापूर वरून लातूरच्या (Latur) दिशेने जाताना उजनी येथील तेरणा नदीवरील पुलावर पहाटेच्या वेळी अचानक टायर फुटले.

त्यामूळे ट्रकभर रस्त्यात उभा करण्यात आला होता. त्याच वेळी ट्रकने (केए २८ सी २०४०) उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक एवढी जोराची होती की पुढील ट्रक पूर्णतः रस्त्याच्या कडेला ढकलला गेला. परंतु धडक देणाऱ्या ट्रकच्या पुढील बाजू पूर्ण चक्काचूर झाला असून चालकाचा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी असुन त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Weekly Horoscope 24 to 30 November 2025: लक्ष्मी नारायण राजयोग मेष अन् कर्क राशीसह 5 राशींना करेल मालामाल

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

SCROLL FOR NEXT