drone
drone  google
मराठवाडा

Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ड्रोनची निर्मिती; ड्रोन क्लस्टरसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : भारतीय ड्रोन उद्योग पुढील १०-१२ वर्षात २० पटीने वाढणार आहे. तसेच देशाच्या सुरक्षेतेचा विचार करता आपल्याला ड्रोन तंत्रज्ञान विकसित करावीच लागेल, यादृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने ऑरिक येथे गोदावरी ड्रोन क्लस्टरची स्थापना करण्यात येणार असून सरकारने या बाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्र सरकारला पाठवला आहे, अशी माहिती मॅजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्टार्टअप विकेंड दरम्यान ब्रह्म रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय पागे यांनी दिली.

ऑरिक येथे विकसित होणारे ड्रोन क्लस्टर ५० एकर जागेवर विकसित होणारे आहे. हे क्लस्टर लघु आणि मध्यम उद्योगाना ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याला मोठी मदत करेल. हे ड्रोन क्लस्टर मुळे स्वदेशी ड्रोन उत्पादनाला चालना मिळणार असून, प्रमुख उत्पादक नजीकच्या काळात बिडकिन येथे मोठी गुंतवणूक करतील. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून या क्लस्टर ची निर्मिती होणार असून, ऑरिक देखील यामध्ये वाटा उचलणार आहे.

मॅजिक स्टार्टअप विकेंड दरम्यान सिडबी बँकेने देखील प्रकल्पासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी देशाचे अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर पुढील सहा महिन्यात प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरुवात होऊ शकते.

ऑरीक बिडकिन येथे ड्रोन क्लस्टर सोबतच डिफेन्स हब विकसित होणार असून या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी येथे गुंतवणुकीला अनुकूलता दर्शवली आहे. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात येथे स्वतंत्र हवाई धावपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे येत असून, संरक्षण उत्पादन क्षेत्राला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे प्रकल्प अहवालात देण्यात आली आहे.

या ड्रोन क्लस्टर मध्ये या गोष्टी असतील

प्रायोगिक उत्पादन आणि चाचणी सुविधांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर ‘पे अँड यूज’ तत्त्वावर वापर

सामान्य चाचणी आणि प्रमाणन केंद्र

संशोधन डिझाइन आणि विकास केंद्र

ड्रोन पायलट अकादमी

ऑरिकच्या माध्यमातून एमएसएमईसाठी इन्फ्रा सपोर्ट

ड्रोन क्लस्टरचे फायदे

-हजारो तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीच्या संधी.

- आयातीवरील अवलंबित्व कमी करून, आत्मनिर्भर आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांना पाठबल

- राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रात भारतासाठी महत्त्वपूर्ण स्वयंपूर्णता प्राप्त करून देणार.

- मजबूत ड्रोन इकोसिस्टमचा विकासित करणार.

- जागतिक ड्रोन हब म्हणून भारताची स्थापना करणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT