मराठवाडा

माळरान उजाड, मेंढरांवर संक्रांत

प्रा. डॉ. रवींद्र भताने

‘चाकूर तालुक्यातील चापोली गाव. माळरान पार भकास पडलंय. आतापासूनच मेंढरांना चारायची पंचायत झालीया. पुढं शिवारात प्यायला पाणीबी भेटायची पंचायत व्हणार हाय. २०१६ मध्ये व्याजानं पैसे उचलून १०० शेळ्या इकत घेतल्या होत्या. पुढचे आठ महिने त्यांना काय खाऊ घालू... दावणीला उपाशी मरायलेले कसं बघू वाटंल... म्हणून आता मला माझ्याजवळील मेंढरं फुकापदरी इकल्याशिवाय कायबी पर्याय न्हाय. आमासनी शेतजमीन कायबी न्हाय. आमचं पोटच शेळ्यामेंढ्यावर चालतंय. पण निसर्गानं आमच्या पोटावरच पाय दिलाय...’ अशी व्यथा मांडताना येथील तुळशीराम काचे यांनी दुष्काळाची दाहकता दाखवून दिली.

‘आज इथं तर उद्या तिथं, परपंच सारा पाठीवर, बाळूमामाची मेंढरं निघाली, बाळूमामाची मेंढरं...’  हे लोकप्रिय गीत गुणगुणत धनगर समाजबांधव दऱ्याखोऱ्यांत आपली मेंढरं चारत दिवस घालवतात. शेतजमीन नसल्याने हे समाजबांधव मुख्यतः शेळ्या-मेंढ्यांचे संगोपन करतात. मात्र यावर्षी परिसरात अत्यल्प पाऊस पडल्याने पावसाळ्यातच माळरान भकास झाले आहे. त्यामुळे मेंढपाळांवर मोठे संकट ओढवले आहे. दिगंबर काचे सांगतात, ‘२०१५ च्या वेळी दुष्काळ पडला तवा मी माझ्याजवळील ९० पैकी ६० शेळ्या-मेंढ्या विकल्या होत्या. त्यावर्षी मला मोठा तोटा झाला होता. नंतर पुढच्या वर्षी व्याजानं पैसे उचलत ५० शेळ्या-मेंढ्या विकत घेतल्या. आता पुन्हा यावर्षी दुष्काळ पडलाय. आता पुन्हा तीच वेळ आमच्यावर आली आहे. या दुष्काळाने आमचे कंबरडेच मोडले आहे.’

शेळ्या-मेंढ्यावरच आमचं पोट आहे. मागच्या दुष्काळाने आम्हाला आर्थिक फटका बसला होता. त्यातून सावरतो न सावरतो, तोच यंदाचा दुष्काळ समोर उभा ठाकला आहे. काही दिवसांनी लेकरांसारखी पोसलेली मेंढरं विकल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.
- अंकुश काचे, चापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT