crime news 
मराठवाडा

नांदेडचे दोन युवक मित्रांसोबत पोहायला गेले आणि शेततळ्यात... 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : वसमत तालुक्यातील बागल पार्डी येथे एका शेततळ्यात बुडून दोन युवकांचा म्रुत्यु झाल्याची घटना मंगळवारी (ता. 10) दुपारी साडेतीन वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील पाच ते सहाजण बागल पार्डी येथील मित्रांसोबत मंगळवारी बागल पार्डी येथे आले होते. ते पंचायत समितीचे उपसभापती विजय नरवाडे यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले.

त्यापैकी अवधूत कोयलवार (वय 21) व अनिल खरे (वय 20) (दोघे राहणार पोर्णिमानगर, नांदेड) यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते घाबरून गेले व पाण्यात बुडाले. 

त्यानंतर आरडाओरडा झाल्याने परिसरातील शेतकरी धावून आले. घटनेची माहिती कुरूंदा पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व बिट जमादार बी.टी. केद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्यातून वर काढले व पुढील कार्यवाहीसाठी कुरुंदा येथील आरोग्य केंद्रात नेले आहेत. याबाबत कुरूंदा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''आम्हाला बहीण-भाऊ म्हणू नका'', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? राजकीय संकेत काय?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Latest Marathi News Live Update : बीडच्या प्रभाग १६ मध्ये मतदान केंद्रासमोरच पैसे वाटप; VIDEO

Ajit Pawar : 'मिनी भारत' ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आवाहन

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

SCROLL FOR NEXT