file photo 
मराठवाडा

हिंगोली आगारात कोरोना संकटात काळात कर्मचाऱ्यांचे सव्वा दोन कोटीचे वेतन थकले

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोनाच्या संकटामध्ये परीवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे कर्मचाऱ्यांना जवळपास तीन महिन्यापासून वेतन वाटप झाले नाही. हिंगोली आगारातील वाहक, चालक, मेकनिक, प्रशासकीय अधिकारी आदींचे जवळपास सव्वा दोन कोटी रूपये थकीत असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

कोरोना आजाराच्या टाळेबंदीचा फटका संपूर्ण देशभरात बसला आहे . कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मार्च महिना अखेर पासूनच अंतर जिल्हा व जिल्हाबाह्य बसफेर्या बंद करण्यात आल्या होत्या. जवळपास सात महिने बसफेर्या बंद असल्याने आगाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला . कालांतराने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने प्राथमिक स्तरावर बसमधून मालवाहतूक सुरू करण्यात आली . त्यानंतर दुसऱ्या टप्यात ५० टक्के तत्वावर प्रवाशांची ने - आण करण्यासाठी मुभा देण्यात आली.

आर्थिक फटक्यामुळे कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने वेतन

परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याने काही दिवस बसफेर्या बंद करण्यात आल्या होत्या आता शासनाने शंभर टक्के प्रवासी बसविण्यासाठी मुभा देण्यात आल्याने वाढल्याने आर्थिक उत्पन्नही आगाराचे वाढत गेले. तरी देखील टाळेबंदीच्या मोठ्या आर्थिक फटक्यामुळे कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने वेतन दिले जात आहे. 

आगार प्रमुखासह १२० चालक, १२०  वाहक, ३५ मेकॅनिक, २५ प्रशासकीय कर्मचारी कार्यरत

हिंगोली आगारात आगार प्रमुखासह १२० चालक, १२०  वाहक, ३५ मेकॅनिक, २५ प्रशासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक महिन्याला त्यांच्या वेतनासाठी जवळपास ७० लाख  रूपये लागतात. जुलै, ऑगस्ट,  सप्टेंबर या तीन महिन्याचे  जवळपास सव्वा दोन कोटी रूपये  थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्थचक्र  बिघडले असून त्यांना आर्थिक  अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान आता बससेवा सुरळीत होत असुन प्रवासी देखील वाढत असल्याने  कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT