file photo 
मराठवाडा

शेतीच्या वादातून आठजणांना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

लोहा (जिल्हा नांदेड) : भावाच्या हिस्स्यातील शेतीचा जबरीने ताबा घेणाऱ्या मोठ्या भावाला लोहा येथील न्यायाधिश डी. आर. आरगडे यांनी आठ जणांना दोन वर्ष सक्त मजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली. 

पिंपळगाव ढगे (ता. लोहा) येथील मारोती टोकलवाड यांनी आपला मुलगा गजानन मारूती टोकलवाड यांच्या वाट्यातील जमीन गट क्र. १८३ मधील एक हेक्टर ३७ आर भूखंड दिला होता. परंतु हा भूखंड त्यांचा दुसरा मुलगा ज्ञानेश्वर टोकलवाड यांनी जबरीने ताबा घेतला. तसेच या शेतात वाटेकरी लावून मशागत सुरू केली आणि वाद निर्माण केला. ही घटना ता. २६ मार्च २०१६ रोजी घडली होती. या प्रकरणात मारोती टोकलवाड यांनी लोहा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून लोहा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

प्रकरणात सहा साक्षिदार
न्यायालयाने या प्रकरणात सहा साक्षिदार तपासले. सर्व पुरावे व पोलिसांचा योग्य तपास असल्याने यात न्यायाधिश डी. आर. आरगडे यांनी शुक्रवारी (ता. १०) जानेवारी रोजी महत्वपूर्ण निकाल दिला. त्यांनी आठ जणांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्ष सक्त मजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्यामध्ये ज्ञानेश्वर मारूती टोकलवाड, दौलत ज्ञानेश्वर टोकलवाड, गंगासागर टोकलवाड ( रा.  ढगे पिंपळगाव), नारायण संभाजी पंदलवाड, माधव नारायण पंदलवाड, संभाजी  नारायण पंदलवाड ( रा. धावरी), हिरासिंग कारजसिंग सिंधू, जागिरसिंग रूपसिंग खिपल ( रा. नावघाट, नांदेड) यांचा समावेश आहे. पैरवी अधिकारी अशोक पल्लेवाड यांनी बाजू मांडली. यावेळी उपनिरिक्षक बी. आर.जायभाये उपस्थिती होते.

लाखोंचा जप्त मुद्देमाल केला परत 
नांदेड : पोलीस स्थापना दिन (रेजिंग डे) सप्ताहादरम्यान आज शहर उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक अभिजित फस्के आणि वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांनी १५ गुन्ह्यांमधील चोरीला गेलेल्या १० दुचाकी, तीन मोबाईल आणि एक सोन्याची अंगठी असा एकूण दोन लाख ८३ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशावरून फिर्यादींना परत केला.

दोन लाख ८३ हजार ४९९ रुपयांचा ऐवज
पोलीस रेजिंग डेच्या पहिल्या दिवशी दोन जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जाहीर केले होते की, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला मुद्देमाल परत करू असे जाहीर केले होते. त्यानुसार आज शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिजित फस्के, वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांनी वेगवेगळ्या १५ गुन्ह्यांमधील दोन लाख ८३ हजार ४९९ रुपयांचा ऐवज संबंधीत फिर्यादींना परत केला आहे. या फिर्यादींमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी सुध्दा आहे. ज्यांचा १३ हजार ४९९ रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला होता. तो परत करण्यात आला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT