Spinal Muscular Atrophy News esakal
मराठवाडा

अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार, १६ कोटींच्या इंजेक्शनानं मिळालं 'जीवदान'

१८ महिन्यांच्या चिमुकल्याला 'हा' दुर्मिळ आजार जडला आहे.

संजय रानभरे

घाटनांदूर (जि.बीड ) : येथील दत्ता विष्णू पुरी या १८ महिन्यांच्या चिमुकल्याला स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (एसएमए) हा दुर्मिळ आजार (Disease) जडला आहे. या आजारावरील झोलगेनएसएमए हे जीन थेरपीचे १६ कोटींचे इंजेक्शन मुंबई (Mumbai) येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बुधवारी (ता.३०) देण्यात आल्याने त्याला जीवदान मिळणार आहे. स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारावर अजूनपर्यंत औषध उपलब्ध नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून विदेशातून 'झोलगेनएसएमए' नावाचे इंजेक्शन खरेदी करावे लागते. एका जागतिक संस्थेकडून दर महिन्याला जागतिकस्तरावर एक 'लकी ड्रॉ' घेण्यात येतो. (Eighteen Months Old Child Face Spinal Muscular Atrophy, 16 Crores Injection Give New Life Beed News)

या 'ड्रॉ'च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जगभरातून एका रुग्णाची निवड करून त्याला हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन मोफत दिले जाते. दत्ता पुरी या चिमुकल्याची या 'लकी ड्रॉ' च्या माध्यमातून निवड झाली आहे. त्याच्यावर मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन बुधवारी देण्यात आले आहे. विष्णू पुरी यांच्या दोन्ही अपत्यांना 'एसएमए' हा आजार आहे. मात्र ही जीन थेरपी दोन वर्षांखालील मुलांनाच देण्यात येत असल्याने पुरी यांची सहा वर्षांची मुलगी सीमा हिला ही जीन थेरपीचे इंजेक्शन मिळू शकत नाही. "नेमका हा आजार काय आहे ? स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (एसएमए) हा एक दुर्मिळ आजार आहे. जनुकीय बदलांमुळे होणारा हा आजार आहे. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होत जातात. सुरुवातीला हात, पाय व नंतर फुफ्फुसांचे स्नायू कमकुवत होत जातात. हा आजार दिवसेंदिवस वाढत जाणारा असल्याने पुढे चालून चेहरा व मानेच्या स्नायूंचे काम कमी होऊन अन्न व पाणी गिळण्यासाठीही अडचण निर्माण होते. स्नायू कमकुवत होऊन निकामी होत जातात.

हा आजार कशामुळे होतो ?

शरीरातील स्नायू आणि मज्जातंतूंना जीवंत राहण्यासाठी 'सर्व्हायवल मोटोर न्यूरॉन' (एसएमएन) हे प्रोटीन आवश्यक असते. तसेच मेंदूकडून शरीराला इलेक्ट्रीक सिग्नल पाठवण्यासाठी हे प्रोटीन अत्यंत गरजेचे असते. शरीरात एसएमएन प्रोटिनची कमतरता असेल तर स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (एसएमए ) हा आजार जडतो.

स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (एसएमए) हा जन्मत:च होणारा एक दुर्मिळ आजार आहे. यात रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. फुप्फुसावरही ताण पडतो. त्यासाठी लागणारे झोलगेन एसएमए हे इंजेक्शन खुप महाग आहे. परंतू या औषधामुळे रुग्णाच्या नसांची (मसल) शक्ती वाढून आजार पूर्णपणे बरा होतो.

डॉ. अंबादास गुणाल, बालरोग तज्ज्ञ, अंबाजोगाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT